lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > PF मधील पैसे काढण्यासंदर्भात EPFOचा महत्त्वपूर्ण निर्णय 

PF मधील पैसे काढण्यासंदर्भात EPFOचा महत्त्वपूर्ण निर्णय 

पीएफचे पैसे काढण्याचा तुम्ही विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2018 11:03 AM2018-04-17T11:03:01+5:302018-04-17T11:03:01+5:30

पीएफचे पैसे काढण्याचा तुम्ही विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे

epfo issued new dirction on pf claim | PF मधील पैसे काढण्यासंदर्भात EPFOचा महत्त्वपूर्ण निर्णय 

PF मधील पैसे काढण्यासंदर्भात EPFOचा महत्त्वपूर्ण निर्णय 

नवी दिल्ली - पीएफचे पैसे काढण्याचा तुम्ही विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. कारण कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPFO) विभागाने याबाबत नवा नियम जाहिर केला आहे. पीएफमधून दहा लाख रूपयांपेक्षा अधिक रक्कम काढण्यासाठी EPFOने घेतल्या निर्णयावर आता युटर्न घेतला आहे. पूर्वी पीएफमधून दहा लाख रूपयांपेक्षा अधिक रक्कम काढण्यासाठी EPFOने  ऑनलाईन अर्ज अनिवार्य केला होता. पण आता EPFO ऑनलाईन अर्जासह ऑफलाईन सुविधाही सुरु ठेवली आहे. कर्मचाऱ्यांना पीएफ काढताना होणारा त्रास पाहता EPFOने ऑनलाईन अर्ज दाखल करण्याचा निर्णय मागे घेतला आहे.   

दरम्यान, नोकरदार वर्गासाठी महत्वाच्या असलेल्या कर्मचारी भविष्य निधी (पीएफ)वरील व्याजदर 2017-18 वर्षासाठी 8.55 टक्के होऊ शकतो. ईपीएफओने 2016-17 मध्ये 8.65 टक्के व्याजदराची घोषणा केली होती. त्यापूर्वी 2015-16मध्ये पीएफवरील व्याजदर 8.80 टक्के होता.  

Web Title: epfo issued new dirction on pf claim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.