lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > धक्कादायक! नोटाबंदीच्या आर्थिक वर्षात 88 लाख करदात्यांनी केलं नाही रिटर्न फाइल

धक्कादायक! नोटाबंदीच्या आर्थिक वर्षात 88 लाख करदात्यांनी केलं नाही रिटर्न फाइल

नोटाबंदीच्या वित्त वर्षात 2016-17मध्ये जवळपास 88.04 लाख करदात्यांनी इन्कम टॅक्स रिटर्न फाइल केलेली नसल्याची माहिती समोर आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2019 05:25 PM2019-04-04T17:25:42+5:302019-04-04T17:25:56+5:30

नोटाबंदीच्या वित्त वर्षात 2016-17मध्ये जवळपास 88.04 लाख करदात्यांनी इन्कम टॅक्स रिटर्न फाइल केलेली नसल्याची माहिती समोर आली आहे.

demonetisation year 88 lakh taxpayers not file returns | धक्कादायक! नोटाबंदीच्या आर्थिक वर्षात 88 लाख करदात्यांनी केलं नाही रिटर्न फाइल

धक्कादायक! नोटाबंदीच्या आर्थिक वर्षात 88 लाख करदात्यांनी केलं नाही रिटर्न फाइल

नवी दिल्लीः नोटाबंदीच्या वित्त वर्षात 2016-17मध्ये जवळपास 88.04 लाख करदात्यांनी इन्कम टॅक्स रिटर्न फाइल केलेली नसल्याची माहिती समोर आली आहे. मागील आर्थिक वर्ष 2015-16मध्ये 8.56 लाख रिटर्न फाइल न करणाऱ्या करदात्यांच्या तुलनेत दहा टक्के जास्त आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, 2000-01नंतर गेल्या दोन दशकांमध्ये हे रिटर्न फाइल न करण्याचं सर्वात जास्त प्रमाण आहे. गेल्या काही वर्षांपासून रिटर्न फाइल करणाऱ्यांची संख्या घटत चालली आहे.

इंडियन एक्स्प्रेसच्या माहितीनुसार, आर्थिक वर्ष 2013मध्ये 37.54 लाख डिफॉल्टरच्या तुलनेत वित्त वर्षं 2014मध्ये 27.02 लाख, वित्त वर्ष 2015मध्ये 16.32 लाख, आणि आर्थिक वर्ष 2016मध्ये 8.56 लाख एवढी संख्या राहिली आहे. तसेच प्राप्तिकर विभागाच्या काही अधिकाऱ्यांनीही नोटाबंदीनंतर आर्थिक हालचाली कमी झाल्याचं मान्य केलं असून, अनेकांना नोकऱ्यांना मुकावं लागण्याचंही म्हटलं आहे. त्यामुळेच रिटर्न फाइल करणाऱ्यांच्या संख्येत घट झाल्याचं ते म्हणाले आहेत.

एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, नोटाबंदीनंतर रिटर्न फाइल करणाऱ्यांच्या संख्येत घट आली. परंतु 2016-17मध्ये तर रिटर्न फाइल करणाऱ्यांच्या संख्येत मोठी कपात झाली होती. लोकांचं उत्पन्न आणि नोकऱ्या घटल्यामुळेच ही कपात आल्याचंही या अधिकाऱ्यानं सांगितलं आहे. करदात्यांच्या अंदाजानुसार, 2016-17मध्ये टीडीएस कापून घेणाऱ्यांच्या संख्येत 33 लाखांपर्यंत कमी आली. सीबीडीटीच्या माहितीनुसार, 1.75 कोटींहून अधिक जणांचं टीडीएस/टीसीएस कापलं जातं, परंतु ते रिटर्न फाइल करत नाहीत. सीबीडीटीनं टॅक्स बेस, टॅक्सपेयर, न्यू टॅक्सपेयर आदींची परिभाषाच बदलली आहे.  

Web Title: demonetisation year 88 lakh taxpayers not file returns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.