lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > शेतीतून 'तो' कमावतो वर्षाला 50 लाख रुपये, आपल्यालाही पैसा कमावण्याची संधी

शेतीतून 'तो' कमावतो वर्षाला 50 लाख रुपये, आपल्यालाही पैसा कमावण्याची संधी

शेतीत नवनवीन प्रयोग केल्यास उत्पन्न हे मिळतंच मिळतं,

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2019 09:55 AM2019-04-25T09:55:39+5:302019-04-25T09:55:58+5:30

शेतीत नवनवीन प्रयोग केल्यास उत्पन्न हे मिळतंच मिळतं,

business opportunity of integrated farming india earn more than 50 lacs in a year | शेतीतून 'तो' कमावतो वर्षाला 50 लाख रुपये, आपल्यालाही पैसा कमावण्याची संधी

शेतीतून 'तो' कमावतो वर्षाला 50 लाख रुपये, आपल्यालाही पैसा कमावण्याची संधी

नवी दिल्ली- शेतीत नवनवीन प्रयोग केल्यास उत्पन्न हे मिळतंच मिळतं, असा बऱ्याच शेतकऱ्यांचा अनुभव आहे. बिहारमधल्या मधुबनी जिल्ह्यात राहणारा शेतकरी अशोक कुमारनंही शेतीत वेगळाच प्रयोग केला आहे. अशोक पहिल्यांदा फक्त माशांच्या बीजोत्पादनाची शेती करायचे. परंतु नव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्यांनी शेतीचं महत्त्व समजून घेतलं आहे. या मत्स्यशेतीतून अशोक कुमार वर्षाला 50 लाख रुपये कमावतायत. त्यातील 25 लाख रुपये खर्च होतो आणि उर्वरित 25 लाख वाचतात. त्याच्या या अभिनव प्रयोगामुळे राज्यानंही त्यांना बऱ्याचदा सन्मानित केलं आहे. 
नव्या जमान्याची शेती- एकत्रित शेती प्रणाली ही एक अशी प्रणाली आहे, ज्यात शेती उत्पादन, मधमाशी पालन, भाज्यांचं उत्पादन, मत्स्यपालन यांचा समावेश आहे. या प्रणाली एक-दुसऱ्यांची पूरक असतात. असा प्रयोग केल्यास शेतकरी आपलं उत्पन्न वाढवू शकतो. तसेच त्याचा फायदाही दुप्पट होऊ शकतो.


अशोक कुमार सिंह हे स्वतःच्या जमिनीतच शेती, बागायती, पशुपालन, मत्स्यपालन करत आहेत. यातून त्यांना चांगला नफा मिळतो. त्यांच्या या शेतीतल्या प्रयोगाचा इतर शेतकरीही आदर्श घेत आहेत. अशोक कुमार सिंह हे मुख्यत्वे मत्स्य बीजोत्पादन करून विकतात आणि सोबतच 5 एकराच्या जागेत गहू, बटाटे आणि पालेभाजी पिकवतात, तसेच पशुपालनही करतात. पशुपालनाच्या माध्यमातून मिळणाऱ्या गोबर बायोगॅस आणि वर्मिकम्पोस्टही बनवतात. 

Web Title: business opportunity of integrated farming india earn more than 50 lacs in a year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.