lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > ज्येष्ठांना पोस्टाचा आधार, 'या' योजनेत पैसे गुंतवून भरघोस नफ्यासह मिळवा करातून सुटका

ज्येष्ठांना पोस्टाचा आधार, 'या' योजनेत पैसे गुंतवून भरघोस नफ्यासह मिळवा करातून सुटका

पोस्ट ऑफिस अनेक योजना ग्राहकांना उपलब्ध करून देत असते.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2019 10:06 AM2019-01-04T10:06:49+5:302019-01-04T10:14:41+5:30

पोस्ट ऑफिस अनेक योजना ग्राहकांना उपलब्ध करून देत असते.

biz know all about post office savings scheme for senior citizens | ज्येष्ठांना पोस्टाचा आधार, 'या' योजनेत पैसे गुंतवून भरघोस नफ्यासह मिळवा करातून सुटका

ज्येष्ठांना पोस्टाचा आधार, 'या' योजनेत पैसे गुंतवून भरघोस नफ्यासह मिळवा करातून सुटका

Highlightsपोस्ट ऑफिस अनेक योजना ग्राहकांना उपलब्ध करून देत असते. पोस्टाच्या या योजनाही ग्राहकांच्या फायद्याच्या असतात. पोस्टाच्या या सीनियर सिटिझन सेव्हिंग स्कीम(एससीएसएस)ची मर्यादा ही पाच वर्षांची असते.

नवी दिल्ली- पोस्ट ऑफिस अनेक योजना ग्राहकांना उपलब्ध करून देत असते. पोस्टाच्या या योजनाही ग्राहकांच्या फायद्याच्या असतात. विशेष म्हणजे निवृत्तीच्या काळात पोस्टाच्या या योजनेचा मोठा फायदा होत असून, आपल्याला चांगल्या व्याजासह करातून मुक्तता मिळते. पोस्टाच्या या सीनियर सिटिजन सेव्हिंग स्कीम(एससीएसएस)ची मर्यादा ही पाच वर्षांची असते, पुढे तीन वर्षांनी ती वाढवताही येते. परंतु त्या पॉलिसीची कालमर्यादा संपण्याच्या आधी मुदत वाढवून घ्यावी लागते.

ज्येष्ठ नागरिक बचत खात्यामध्ये (एससीएसएस) 60 वर्षं वयाची व्यक्तीही या योजनेत खातं उघडू शकते. 55 ते 60 वर्षं वयाच्या व्यक्ती निवृत्तीच्या तीन महिने आधीही या योजनेत खातं खोलून पैसे गुंतवू शकतात. खातं उघडल्यानंतर तुम्हाला कमीत कमी 1000 रुपये जमा ठेवावे लागतात. या खात्यात तुम्ही जास्तीत जास्त 15 लाख रुपये जमवू शकता. ज्यावर तुम्हाला वर्षाला 8.7 टक्के व्याज मिळते. या योजनेची मर्यादा पाच वर्षांची असते. डिसेंबर 2018च्या तिमाहीत वरिष्ठ नागरिक बचत योजनेत तुम्हाला प्रतिवर्ष 8.7 टक्के व्याज मिळते. वरिष्ठ नागरिक बचत योजनेवर व्याज 31 मार्च/30 सप्टेंबर/ 31 डिसेंबरला जमा करण्याच्या तारखेपासून लागू आहे. त्यानंतर 31 मार्च, 30 जून, 30 सप्टेंबर, 31 डिसेंबरपर्यंत जमा रकमेवर व्याज मिळणार आहे.

डिसेंबरमध्ये समाप्त होणा-या तिमाहीसाठी पीपीएफमध्ये जमा असलेल्या रकमेवर प्रतिवर्षी 8 टक्के व्याज मिळत होते. आता त्यात 0.10 टक्क्यांची वाढ झाली आहे. दरवर्षी 6000 रुपयांची बचत केल्यास 15 वर्षांनी मुदत संपल्यावर 1.7 लाख रुपये तुम्हाला मिळू शकतात. खात्रीशीर व्याज देणारा आणि सुरक्षित पर्याय तसेच तरुण मुला-मुलींनी बचत सुरू करण्यास प्रारंभीच्या टप्प्यात पीपीएफचा पर्यायाचा विचार केला पाहिजे. जितक्या लवकर बचत सुरू करता येईल तितके चांगले फायदे आपल्याला मिळतात. तसेच या योजनेतून गुंतवणूक प्राप्तिकर अधिनियम, 1961च्या कलम 80Cअंतर्गत करातून सूट दिली जाते.
 

Web Title: biz know all about post office savings scheme for senior citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.