lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > ‘अ‍ॅपल’चे बाजारभांडवल एक ट्रिलियन डॉलर

‘अ‍ॅपल’चे बाजारभांडवल एक ट्रिलियन डॉलर

आयफोन बनविणारी कंपनी ‘अ‍ॅपल’ गुरुवारी जगातील पहिली एक ट्रिलियन डॉलर मार्केट कॅपची (बाजार भांडवल) कंपनी बनली आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 05:10 AM2018-08-03T05:10:28+5:302018-08-03T05:10:51+5:30

आयफोन बनविणारी कंपनी ‘अ‍ॅपल’ गुरुवारी जगातील पहिली एक ट्रिलियन डॉलर मार्केट कॅपची (बाजार भांडवल) कंपनी बनली आहे.

 Apple's market value is a trillion dollar | ‘अ‍ॅपल’चे बाजारभांडवल एक ट्रिलियन डॉलर

‘अ‍ॅपल’चे बाजारभांडवल एक ट्रिलियन डॉलर

न्यूयॉर्क : आयफोन बनविणारी कंपनी ‘अ‍ॅपल’ गुरुवारी जगातील पहिली एक ट्रिलियन डॉलर मार्केट कॅपची (बाजार भांडवल) कंपनी बनली आहे. हा बहुमान प्राप्त करण्यासाठी ‘अ‍ॅपल’ केवळ १६ अब्ज डॉलरने मागे होती. शेअरमध्ये तेजी आल्याने कंपनीने हा मान प्राप्त केला आहे.
‘अ‍ॅपल’नंतर त्यांची प्रतिस्पर्धी कंपनी अ‍ॅमेझॉनचा क्रमांक असून, या दोन कंपन्यांनंतर अल्फाबेटचा (गुगल) क्रमांक आहे. ‘अ‍ॅपल’चे शेअर आज २०७.०५ अमेरिकी डॉलर या आतापर्यंतच्या सर्वाधिक उच्चस्तरावर पोहोचले आणि कंपनीने एक ट्रिलियन अमेरिकी डॉलरचा टप्पा पार केला. ‘अ‍ॅपल’ने मंगळवारीच आपल्या तिमाही परिणामांची माहिती देताना म्हटले आहे की, सप्टेंबरमध्ये कंपनी आयफोनपेक्षा महाग फोन बाजारपेठेत आणणार आहे. त्यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये ५ टक्के वाढ पाहावयास मिळाली. १९९७ मध्ये ‘अ‍ॅपल’ दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर होती. आपले अस्तित्व कायम ठेवण्यासाठी कंपनीने सहसंस्थापक स्टिव्ह जॉब्स यांना सीईओ म्हणून परत आणले. जॉब्स यांनी आयपॉड आणि आयफोनसारखे उत्पादने आणून ‘अ‍ॅपल’ला एका नव्या उंचीवर नेले.

फोनच्या किमतीत वाढ
कंपनीने आपल्या सर्व यापूर्वीच्या मॉडेल्समध्ये २० टक्के वाढ केली आहे. त्यामुळे कंपनीचा नफा वाढला आहे. एप्रिल-जूनच्या तिमाहीत कंपनीच्या आयफोनची विक्री १ टक्का वाढली आहे; पण उत्पन्नात १७ टक्के वाढ झाली आहे. सीईओ टीम कुक यांच्या म्हणण्यानुसार, किमती जास्त असूनही आयफोन-एक्स सर्वांत लोकप्रिय फोन राहिलेला आहे. याची किंमत ९९९ डॉलरपासून सुरू होते.

Web Title:  Apple's market value is a trillion dollar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Apple Incअॅपल