lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > हिरे व्यावसायिक मेहुल चोकसीचे अँटिग्वात पलायन

हिरे व्यावसायिक मेहुल चोकसीचे अँटिग्वात पलायन

हिरे व्यापारी मेहुल चोकसी आता अमेरिकेतून अँटिग्वामध्ये गेला आहे व त्या कॅरेबियन देशचा त्याने पासपोर्टही मिळविला आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 03:56 AM2018-07-25T03:56:39+5:302018-07-25T03:57:25+5:30

हिरे व्यापारी मेहुल चोकसी आता अमेरिकेतून अँटिग्वामध्ये गेला आहे व त्या कॅरेबियन देशचा त्याने पासपोर्टही मिळविला आहे.

Antigua flight of diamond businessman Mehul Choksi | हिरे व्यावसायिक मेहुल चोकसीचे अँटिग्वात पलायन

हिरे व्यावसायिक मेहुल चोकसीचे अँटिग्वात पलायन

नवी दिल्ली: पंजाब नॅशनल बँकेस (पीएनबी) १४ हजार कोटींचा चुना लावून फरार झालेला हिरे व्यापारी मेहुल चोकसी आता अमेरिकेतून अँटिग्वामध्ये गेला आहे व त्या कॅरेबियन देशचा त्याने पासपोर्टही मिळविला आहे. ‘पीएनबी’ घोटाळ््यातील मुख्य आरोपी नीरव मोदी याचा मेहुल चोकसी हा मामा आहे.
चोकसी याच महिन्यात अँटिग्वामध्ये आला व त्याने तेथील पासपोर्ट घेतला, अशी माहिती ‘इंटरपोल’ने काढलेल्या नोटिशीनुसार त्या देशाने भारतास कळविली असल्याचे माहितगार सूत्रांनी सांगितले.
‘पीएनबी’ घोटाळा उघड होऊन गुन्हा नोंदविला जाण्यापूर्वीच चोकसी भारतातून फरार झाला. मुंबईतील विशेष न्यायालयाने अजामीनपात्र वॉरन्ट काढल्यानंतर सीबीआयने त्याआधारे चोकसीविरुद्ध ‘रेड कॉर्नर’ नोटीस जारी करण्याची विनंती ‘इंटरपोल’ला केली. मात्र, अद्याप तशी नोटीस जारी झालेली नाही. नीरव मोदीविरुद्ध अशी नोटीस या आधीच जारी झाली आहे.

Web Title: Antigua flight of diamond businessman Mehul Choksi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.