lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > सप्टेंबरमध्ये ५९२ कोटी जीएसटी महसूल जमा, मुंबई मध्य क्षेत्रातील आकडेवारी

सप्टेंबरमध्ये ५९२ कोटी जीएसटी महसूल जमा, मुंबई मध्य क्षेत्रातील आकडेवारी

केंद्रीय वस्तू व सेवा कर विभागाच्या मुंबई मध्य क्षेत्रात सप्टेंबर महिन्यात ५९२ कोटी रुपयांचा महसूल जमा करण्यात आला. गतवर्षीप्रमाणे यंदादेखील सुमारे २५ हजार करदात्यांनी कर भरला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2018 05:57 AM2018-11-04T05:57:48+5:302018-11-04T05:57:59+5:30

केंद्रीय वस्तू व सेवा कर विभागाच्या मुंबई मध्य क्षेत्रात सप्टेंबर महिन्यात ५९२ कोटी रुपयांचा महसूल जमा करण्यात आला. गतवर्षीप्रमाणे यंदादेखील सुमारे २५ हजार करदात्यांनी कर भरला आहे.

5,292 crore GST revenue receipts in September, Mumbai Central sector figures | सप्टेंबरमध्ये ५९२ कोटी जीएसटी महसूल जमा, मुंबई मध्य क्षेत्रातील आकडेवारी

सप्टेंबरमध्ये ५९२ कोटी जीएसटी महसूल जमा, मुंबई मध्य क्षेत्रातील आकडेवारी

- खलील गिरकर
मुंबई  - केंद्रीय वस्तू व सेवा कर विभागाच्या मुंबई मध्य क्षेत्रात सप्टेंबर महिन्यात ५९२ कोटी रुपयांचा महसूल जमा करण्यात आला. गतवर्षीप्रमाणे यंदादेखील सुमारे २५ हजार करदात्यांनी कर भरला आहे. सीजीएसटी, एसजीएसटी व आयजीएसटीद्वारे जमा झालेल्या महसुलाचा यामध्ये समावेश आहे.
मलबार हिल, हाजी अली, धारावी, आॅपेरा हाउस, वरळी, लालबाग, माटुंगा, शीव, दादर, घोडपदेव या मुंबई मध्यमधील विभागातील करदात्यांनी इनपुट टॅक्स क्रेडिट सिस्टिमचा लाभ घेतल्याने त्यांना करात सवलत मिळाली.
गेल्या वर्षभरात सीजीएसटीमध्ये ७ हजार ५ कोटी रुपयांचा महसूल जमा झाला होता. आॅगस्ट महिन्यातील महसुलात गतवर्षीच्या तुलनेत १५ टक्के वाढ झाली होती.
दरम्यान, ई वे बिल न भरताच व्यापार करण्याची ३ प्रकरणे विभागाने महिनाभरात उघडकीस आणली असून तीन प्रकरणांमध्ये ३ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास सुरू आहे.
यातील एका कंपनीकडून ई वे बिलाची रक्कम दंडासह जमा करण्यात आली आहे. तर, अन्य दोन कंपन्यांबाबत पुढील कार्यवाही सुरू करण्यात आल्याची माहिती सीजीएसटीच्या करचोरी प्रतिबंधक विभागाचे उपायुक्त प्रशांत कुमार यांनी दिली.

‘त्या’ व्यापाऱ्यांवर कारवाई

करदात्यांची संख्या वाढवण्यासाठी व कराचे उत्पन्न वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. करचोरी रोखण्यासाठी कठोर पावले उचलत आहोत. ई वे बिल भरल्याशिवाय व्यापार करण्याचे प्रमाण मोठे असल्याचे उघडकीस आल्याने त्यांच्याविरोधात कडक कारवाई करण्यात येत आहे.
- डॉ. के. एन. राघवन, आयुक्त, केंद्रीय वस्तू व सेवा कर विभाग, मुंबई (मध्य)

Web Title: 5,292 crore GST revenue receipts in September, Mumbai Central sector figures

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.