lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > बाजारात 50 रुपयांच्या बनावट नोटांची चलती, अशी ओळखा खरी नोट

बाजारात 50 रुपयांच्या बनावट नोटांची चलती, अशी ओळखा खरी नोट

नोटाबंदीनंतर सरकारनं आरबीआयच्या मदतीनं 500 आणि 200, 50च्या नोटा चलनात आणल्या, परंतु या नव्या नोटांमध्येही काही नोटा बनावट असल्याचं समोर आलं आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2018 07:20 PM2018-11-23T19:20:23+5:302018-11-23T19:25:02+5:30

नोटाबंदीनंतर सरकारनं आरबीआयच्या मदतीनं 500 आणि 200, 50च्या नोटा चलनात आणल्या, परंतु या नव्या नोटांमध्येही काही नोटा बनावट असल्याचं समोर आलं आहे.

50 rupees counterfeit notes running in the market | बाजारात 50 रुपयांच्या बनावट नोटांची चलती, अशी ओळखा खरी नोट

बाजारात 50 रुपयांच्या बनावट नोटांची चलती, अशी ओळखा खरी नोट

गोरखपूर- नोटाबंदीनंतर सरकारनं आरबीआयच्या मदतीनं 500, 2000, 200 आणि 50च्या नोटा चलनात आणल्या, परंतु या नव्या नोटांमध्येही काही नोटा बनावट असल्याचं समोर आलं आहे. त्यात आता बाजारात मोठ्या प्रमाणात 50 रुपयांच्या बनावट नोटांचा सुळसुळाट असल्याची माहिती मिळाली आहे. बऱ्याचदा फसवणूक करणारे जास्त किमतीच्या बनावट नोटा तयार करून बाजारात विकत असतात.

पहिल्यांदाच 50 रुपयांच्या बनावट नोटा बाजारात आल्या आहेत. विशेष म्हणजे ही नोट मशिनमध्ये छापलेली नाही. तर ती स्कॅन करून बनवण्यात आली आहे. जर तुम्ही काळजीपूर्वक ती नोट पाहिली, तर तुम्हाला बनावट आणि खऱ्या नोटांमधला फरक समजून येईल. खरं तर ग्राहक छोट्या छोट्या नोटाही बारकाईनं पाहात नाहीत, परंतु आता तुम्हाला त्या काळजीपूर्वक पाहाव्या लागणार आहेत. त्यामुळे बँकांनीही सर्व शाखांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. नोटांची खात्री झाल्यानंतरच त्या स्वीकाराव्यात. भारतीय स्टेट बँकेचे सहाय्यक महाव्यवस्थापक अनिलकुमार जयस्वाल म्हणाले, शाखांना या संदर्भात सतर्क करण्यात आलं आहे. 

अशी ओळखा बनावट नोट
बनावट नोटेचा कागद खूपच पातळ असतो. 
खऱ्या नोटेवर चांदीची रेष दिसते, तर बनावट नोटेवर त्याची फोटोकॉपी पाहायला मिळते
बनावट नोट ही खऱ्या नोटेची कॉपी आहे. तिला स्कॅन करून तयार करण्यात येते. 

Web Title: 50 rupees counterfeit notes running in the market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.