lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > सरकारच्या इशाऱ्यावर ५0 कोटी ई-मेल खाती हॅक

सरकारच्या इशाऱ्यावर ५0 कोटी ई-मेल खाती हॅक

२0१४मध्ये याहूच्या सुमारे ५0 कोटी वापरकर्त्यांचा डेटा हॅकिंगच्या माध्यमातून चोरीला गेलेला असावा

By admin | Published: September 24, 2016 05:37 AM2016-09-24T05:37:56+5:302016-09-24T05:37:56+5:30

२0१४मध्ये याहूच्या सुमारे ५0 कोटी वापरकर्त्यांचा डेटा हॅकिंगच्या माध्यमातून चोरीला गेलेला असावा

50 crores e-mail accounts hacked on the government's warning | सरकारच्या इशाऱ्यावर ५0 कोटी ई-मेल खाती हॅक

सरकारच्या इशाऱ्यावर ५0 कोटी ई-मेल खाती हॅक


वॉशिंग्टन : २0१४मध्ये याहूच्या सुमारे ५0 कोटी वापरकर्त्यांचा डेटा हॅकिंगच्या माध्यमातून चोरीला गेलेला असावा, असा संशय याहूनेच व्यक्त केला आहे. या हॅकिंगमागे अमेरिकेची सरकारी यंत्रणा असावी, असेही याहूने म्हटले आहे.
अमेरिकेच्या सिलिकॉन व्हॅलीमधील या कंपनीने केलेल्या तपासातून ही माहिती समोर आली आहे. कंपनीच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, चोरी झालेल्या माहितीत नावे, ई-मेल पत्ते, टेलिफोन क्रमांक, जन्मतारखा, हॅश्ड पासवर्ड (बहुतांश बिक्रिप्टसह), एन्क्रिप्टेड आणि अनएन्क्रिप्टेड सुरक्षा प्रश्न यांचा समावेश आहे. चोरी गेलेल्या माहितीत असुरक्षित पासवर्ड, पेमेंट कार्ड डाटा अथवा बँक खात्यांची माहिती यांचा समावेश नाही. ज्या सिस्टिममधून ही माहिती चोरीला गेली त्या सिस्टिमध्ये पेमेंट कार्ड डाटा आणि बँक खात्यांची माहिती साठवून ठेवलेली नव्हती. कंपनीने म्हटले की, चालू असलेल्या तपासणीत असे
दिसून आले आहे की, ५00 दशलक्ष वापरकर्त्यांची माहिती चोरीला गेली असून, याहूच्या नेटवर्कमध्ये सध्या कोणी सरकारपुरस्कृत अ‍ॅक्टर आहे, असे दिसत नाही. या विषयावर कंपनी सध्या कायदेपालन संस्थांसोबत काम करीत आहे. एफबीआयला या घुसखोरीची माहिती आहे. एफबीआय त्याचा तपासही करीत आहे. (वृत्तसंस्था)
>१0 हजार युजर्सना कंपनीने सुरक्षाविषयक जारी केल्या सूचना
याहू ही कंपनी अलीकडेच व्हेरीझॉनने विकत घेतली आहे. हा व्यवहार अजून पूर्ण व्हायचा आहे. या व्यवहारावर हॅकिंगचा परिणाम होऊ शकतो, असे या क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले. अलीकडच्या काळात सरकारपुरस्कृत माहिती चोरीचे प्रकार वाढत चालले आहेत. याहू आणि अन्य कंपन्यांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर या कंपन्यांनी असे वापरकर्ते शोधून काढण्यासाठी प्रोग्रॉम लाँच केला आहे. याहूने डिसेंबर २0१५मध्ये हा प्रोग्राम लाँच केला. त्यानंतर १0 हजार युजर्सना कंपनीने सुरक्षाविषयक सूचना जारी केल्या आहेत.

Web Title: 50 crores e-mail accounts hacked on the government's warning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.