lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > रिझर्व्ह बॅँक ओतणार १५ हजार कोटी रुपये

रिझर्व्ह बॅँक ओतणार १५ हजार कोटी रुपये

पुढील महिन्यामध्ये सरकारी रोख्यांची लिलावाद्वारे विक्री करून भारतीय रिझर्व्ह बॅँक अर्थव्यवस्थेमध्ये १५ हजार कोटी रुपये ओतणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 05:25 AM2019-05-27T05:25:49+5:302019-05-27T05:26:01+5:30

पुढील महिन्यामध्ये सरकारी रोख्यांची लिलावाद्वारे विक्री करून भारतीय रिझर्व्ह बॅँक अर्थव्यवस्थेमध्ये १५ हजार कोटी रुपये ओतणार आहे.

15 thousand crores of rupees will be thrown by the Reserve Bank | रिझर्व्ह बॅँक ओतणार १५ हजार कोटी रुपये

रिझर्व्ह बॅँक ओतणार १५ हजार कोटी रुपये

नवी दिल्लीः पुढील महिन्यामध्ये सरकारी रोख्यांची लिलावाद्वारे विक्री करून भारतीय रिझर्व्ह बॅँक अर्थव्यवस्थेमध्ये १५ हजार कोटी रुपये ओतणार आहे. देशात रोकड टंचाई जाणवू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये पैसा खेळता राहावा यासाठी त्याचे योग्य नियोजन करण्याची जबाबदारी भारतीय रिझर्व्ह बॅँकेकडे असते. त्यानुसार देशातील अर्थव्यवस्थेचा व चलनाचा आढावा घेऊन त्यानुसार धोरण ठरविले जाते. शुक्रवारी भारतीय रिझर्व्ह बॅँकेने आगामी धोरणाबाबतची घोषणा केली.
पुढील महिन्यामध्ये खुल्या बाजारातून १५ हजार कोटी रुपयांच्या सरकारी रोख्यांची विक्री करून तो पैसा चलनात आणून रोकड टंचाई जाणवणार नाही, यासाठी रिझर्व्ह बॅँक प्रयत्न करणार आहे. तसेच यानंतर तीन महिन्यांनी पुन्हा याबाबतचा आढावा घेतला जाणार आहे.

Web Title: 15 thousand crores of rupees will be thrown by the Reserve Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.