lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > जेटलींनी सांगितली तेलाच्या किमती वाढण्यामागची कारणे, विरोधकांवर केली टीका 

जेटलींनी सांगितली तेलाच्या किमती वाढण्यामागची कारणे, विरोधकांवर केली टीका 

पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये काही प्रमाणात कपात केल्यानंतर आता  केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी विरोधकांच्या टीकेचा समाचार घेण्यास सुरुवात केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2018 01:38 PM2018-10-06T13:38:46+5:302018-10-06T13:41:09+5:30

पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये काही प्रमाणात कपात केल्यानंतर आता  केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी विरोधकांच्या टीकेचा समाचार घेण्यास सुरुवात केली आहे.

Jaitley told the reasons behind the increase in oil prices | जेटलींनी सांगितली तेलाच्या किमती वाढण्यामागची कारणे, विरोधकांवर केली टीका 

जेटलींनी सांगितली तेलाच्या किमती वाढण्यामागची कारणे, विरोधकांवर केली टीका 

नवी दिल्ली - पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये काही प्रमाणात कपात केल्यानंतर आता  केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी विरोधकांच्या टीकेचा समाचार घेण्यास सुरुवात केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये होत असलेल्या वाढीमुळे निर्माण झालेले दरवाढीचे आव्हान विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या ट्विटर आणि वृत्तवाहिन्यांवरून होणाऱ्या टीकेमुळे कमी होणारे नाही. ही गंभीर समस्या आहे. तेल उत्पादक देशांना उत्पादन घटवले आहे. त्यामुळे मागणी आणि पुरवठ्यामध्ये मोठा फरक निर्माण झाला आहे.  

फेसबूकवर लिहिलेल्या ब्लॉगमधून जेटलींनी तेलाच्या किमती वाढण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या आंतरराष्ट्रीया कारणांची विस्तारपूर्वक माहिती दिली आहे. "व्हेनेझुएला आणि लिबियामधील राजकीय संकटामुळे या देशातील तेलाच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. तसेच अमेरिकेने इराणवर लादलेल्या निर्बंधांमुळे तेलाच्या पुरवठ्यामधील अनिश्चितता वाढली आहे. तसेच क्रूड ऑइलच्या किमती मर्यादेत ठेवण्यासाठी आणण्यात येणारा शेल गॅसही वेळापत्रकाहून खूप उशिराने येत आहे, त्यामुळे तेलाच्या किमती वाढत आहेत, असे जेटलींनी सांगितले. 


  "तेलाच्या वाढत्या किमतीमुळे चालू खात्यातील तुटीवर परिणाम झाला आहे. तसेच चलनावरही त्याचा परिणाम दिसून येत आहे. तेलाच्या वाढत्या किमतींचा राजकीय फायदा विरोधी पक्ष उठवतात. मात्र पेट्रोल आणि डिझेलच्या किमती घटवल्यावर त्यांनी मौन पाळले आहे." असे जेटली म्हणाले. तसेच तेलाच्या किमती पुन्हा नियंत्रणात आणण्याचा कोणताही विचार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.   

Web Title: Jaitley told the reasons behind the increase in oil prices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.