lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > भूखंडासाठी कर्ज दिल्यास परवडणारी घरे उपलब्ध करणे शक्य

भूखंडासाठी कर्ज दिल्यास परवडणारी घरे उपलब्ध करणे शक्य

शहर- महानगरांमध्ये परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने भूखंड खरेदीसाठीही वित्तपुरवठ्याच्या योजना आणाव्यात, असे आवाहन कॉन्फेडरेशन आॅफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोशिएशन इंडिया(क्रेडाइ)चे राष्टÑीय अध्यक्ष जक्षय शहा यांनी केले.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 01:48 AM2018-02-13T01:48:14+5:302018-02-13T01:48:31+5:30

शहर- महानगरांमध्ये परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने भूखंड खरेदीसाठीही वित्तपुरवठ्याच्या योजना आणाव्यात, असे आवाहन कॉन्फेडरेशन आॅफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोशिएशन इंडिया(क्रेडाइ)चे राष्टÑीय अध्यक्ष जक्षय शहा यांनी केले.

It is possible to make affordable homes available for land tenure | भूखंडासाठी कर्ज दिल्यास परवडणारी घरे उपलब्ध करणे शक्य

भूखंडासाठी कर्ज दिल्यास परवडणारी घरे उपलब्ध करणे शक्य

- संकेत सातोपे

हैदराबाद : शहर- महानगरांमध्ये परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने भूखंड खरेदीसाठीही वित्तपुरवठ्याच्या योजना आणाव्यात, असे आवाहन कॉन्फेडरेशन आॅफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोशिएशन इंडिया(क्रेडाइ)चे राष्टÑीय अध्यक्ष जक्षय शहा यांनी केले.
प्रधान मंत्री आवास योजनेतून पहिल्या घरासाठी देण्यात येणारी सवलत दुसºया घरासाठीही देण्यात यावी, अशीही मागणी त्यांनी केली.
क्रेडाइच्या युवा शाखेचे द्वितीय वार्षिक संमेलन शुक्रवार-शनिवारी हैदराबाद येथे पार पडले. संमेलनात सातशे युवा बांधकाम व्यावसायिक सहभागी झाले होते.
स्टार्ट अप इंडियासारख्या योजनांद्वारे केंद्र शासन नवउद्योजकांना आणि नव्या उद्योग उभारणीला प्रोत्साहन देत आहे. मात्र बांधकाम क्षेत्राकडे अद्यापही उद्योग या दृष्टीने पाहिले जात नाही. त्यातच बांधकाम साहित्य आणि जागांच्या किमती वाढत आहेत.
गेल्या दोन वर्षांत सिमेंटची किंमत तब्बल ३० टक्क्यांनी वाढली आहे. परिणामत: घरांची किमतीही वाढत आहेत. तरीही मागणीत घट झालेली नाही. फक्त आता मोठ्याऐवजी परवडणाºया घरांना अधिक मागणी आहे, असे क्रेडाइचे राष्टÑीय उपाध्यक्ष सतीश मगर यांनी सांगितले.

Web Title: It is possible to make affordable homes available for land tenure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Homeघर