lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > क्लाउड ऑफरिंगला चालना देण्यासाठी IBM करणार HashiCorpचं अधिग्रहण, काय होणार फायदा?

क्लाउड ऑफरिंगला चालना देण्यासाठी IBM करणार HashiCorpचं अधिग्रहण, काय होणार फायदा?

IBM to acquire HashiCorp: पाहा किती बिलयन डॉलर्सना होणार ही डील आणि काय होणार या डीलचा फायदा.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2024 12:56 PM2024-04-25T12:56:59+5:302024-04-25T12:57:59+5:30

IBM to acquire HashiCorp: पाहा किती बिलयन डॉलर्सना होणार ही डील आणि काय होणार या डीलचा फायदा.

IBM will acquire HashiCorp to promote cloud offerings, what will be the benefit? | क्लाउड ऑफरिंगला चालना देण्यासाठी IBM करणार HashiCorpचं अधिग्रहण, काय होणार फायदा?

क्लाउड ऑफरिंगला चालना देण्यासाठी IBM करणार HashiCorpचं अधिग्रहण, काय होणार फायदा?

इंटरनॅशनल बिझनेस मशिन्स म्हणजे आयबीएमनं (IBM) धोरणात्मक रणनितीनुसार HashiCorpचं अधिग्रहण करणार असल्याची घोषणा केली. आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) अॅप्लिकेशन्सद्वारे सुरू असलेल्या मागणीच्या वाढीदरम्यान क्लाउड-आधारित सॉफ्टवेअर उत्पादनांच्या माध्यमातून IBM च्या पोर्टफोलिओला बळकट करणं, हा यामागील उद्देश आहे. हा करार ६.४ बिलियन डॉलर्समध्ये करण्यात आलं आहे.
 

३५ डॉलर्स प्रति शेअर किंमतीनं HashiCorp चं अधिग्रहण करण्यात येणार आहे. हे दर हाशिकॉर्पच्या सोमवारच्या बंद किंमतीच्या तुलनेत ४२.६ टक्के प्रीमिअम आहेत. आयबीआएमनं हाशिकॉर्पचं ३५ डॉलर्स प्रति शेअरनं अधिग्रहण करण्याचं वृत्त माध्यमांमध्ये मंगळवारी प्रसिद्ध झाल्यानंतर मंगळवारी शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. 
 

वाढत्या व्याजदरांमुळे त्यांच्या सल्लागार व्यवसायाला आव्हानांचा सामना करावा लागत आहे. असं असतानाही आयबीएमच्या सॉफ्टवेअर क्षेत्रानं मजबूत कामगिरी दाखवल्यानं हा करार करण्यात आला आहे. आयबीआएमचं क्लाउड सेवांवर लक्ष केंद्रित करणं हा एआय तंत्रज्ञानासाठी आवश्यक असलेल्या मोठ्या डेटा स्टोरेज आणि प्रक्रिया क्षमतांच्या गरजेचा फायदा घेण्यासाठी व्यापक धोरणाचा एक भाग असल्याचं म्हटलं जातंय.
 

महसूल वाढला
 

पहिल्या तिमाहीत एआय संबंधित महसूलानं १ बिलियन डॉलर्सचा टप्पा ओलांडला होता. यातून त्यात होत असलेली वाढही दिसून येते. या आकडेवारीमध्ये कंपनीच्या पोर्टफोलिओमधील विविध ऑफरिंगमधील वास्तविक विक्री आणि बुकिंगचा समावेश आहे. हाशिकॉर्पसोबतचा हा करार २०२४ च्या अखेरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

Web Title: IBM will acquire HashiCorp to promote cloud offerings, what will be the benefit?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.