lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > पहिल्या सहामाहीमध्ये सोन्याची आयात वाढली

पहिल्या सहामाहीमध्ये सोन्याची आयात वाढली

जगातील सोन्याचा सर्वात मोठा आयातदार असलेल्या भारतात चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीमध्ये सोन्याची आयात ४ टक्क्यांनी वाढली आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 03:05 AM2018-10-22T03:05:06+5:302018-10-22T03:05:13+5:30

जगातील सोन्याचा सर्वात मोठा आयातदार असलेल्या भारतात चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीमध्ये सोन्याची आयात ४ टक्क्यांनी वाढली आहे.

Gold imports increased in the first half of the year | पहिल्या सहामाहीमध्ये सोन्याची आयात वाढली

पहिल्या सहामाहीमध्ये सोन्याची आयात वाढली

नवी दिल्ली- जगातील सोन्याचा सर्वात मोठा आयातदार असलेल्या भारतात चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीमध्ये सोन्याची आयात ४ टक्क्यांनी वाढली आहे. याचा परिणाम देशाच्या चालू खात्यावरील तूट वाढण्यात होत आहे.
एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांमध्ये १६.९६ अब्ज डॉलरच्या सोन्याची आयात करण्यात आली. विशेष म्हणजे, जून महिन्यापर्यंत भारतामध्ये होणारी सोन्याची आयात जवळपास बंदच होती. त्यानंतर मात्र सोन्याच्या आयातीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली दिसून आली आहे.
डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरती किंमत आणि घसरत असलेला शेअर बाजार यामुळे सोन्यातील गुंतवणूक वाढत असल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे. मात्र, या वाढीव आयातीमुळे देशाच्या चालू खात्यावरील तूट वाढत चालली आहे. याचा परिणाम अर्थसंकल्पीय तूट वाढण्यात होईल.

Web Title: Gold imports increased in the first half of the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Goldसोनं