lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > जीडीपीसह आयात वाढणार

जीडीपीसह आयात वाढणार

येत्या काळात देशाच्या जीडीपीमध्ये वाढ होईल. पण त्याचवेळी वाढत्या आयातीमुळे व्यापारी तूट चिंतेचा विषय असेल, असे मत सीआयआयच्या राष्ट्रीय बैठकीत उपस्थित सीईओंनी व्यक्त केले.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 01:26 AM2018-06-12T01:26:19+5:302018-06-12T01:26:19+5:30

येत्या काळात देशाच्या जीडीपीमध्ये वाढ होईल. पण त्याचवेळी वाढत्या आयातीमुळे व्यापारी तूट चिंतेचा विषय असेल, असे मत सीआयआयच्या राष्ट्रीय बैठकीत उपस्थित सीईओंनी व्यक्त केले.

GDP increases with  Import | जीडीपीसह आयात वाढणार

जीडीपीसह आयात वाढणार

नवी दिल्ली - येत्या काळात देशाच्या जीडीपीमध्ये वाढ होईल. पण त्याचवेळी वाढत्या आयातीमुळे व्यापारी तूट चिंतेचा विषय असेल, असे मत सीआयआयच्या राष्ट्रीय बैठकीत उपस्थित सीईओंनी व्यक्त केले. या बैठकीत ८२ प्रमुख कंपन्यांच्या सीईओंनी देशाच्या आर्थिक स्थितीबाबतचे मत नोंदवले. ७२ टक्के सीईओंनी देशाचा आर्थिक विकास दर (जीडीपी) ७ ते ७.५ टक्क्यांपर्यंत राहण्याचा अंदाज व्यक्त केला. फक्त ३ टक्के सीईओंनी जीडीपी ६.५ टक्क्यांपर्यंत घसरण्याचे मत मांडले आहे.

५९ टक्के सीईओंनी देशांतर्गत
खासगी गुंतवणूक वाढून अर्थव्यवस्था सुधरेल, असे मत मांडले आहे. १५ टक्के सीईओ अर्थव्यवस्थेची पत घसरेल, असा अंदाज व्यक्त करीत आहेत. ६३ टक्के सीईओंनी देशाची आयात वाढेल, असे मत व्यक्त केले. त्या तुलनेत निर्यात वाढण्याचा अंदाज फक्त ५५ टक्क्यांनीच व्यक्त केला. आयात अधिक होण्याची शक्यता असल्याने व्यापारी तूट वाढेल, असे ६१ टक्के सीईओंना वाटते. केंद्र सरकार ‘मेक इन इंडिया’चा गाजावाजा करीत देशाची निर्यात वाढल्याचा दावा करीत आहे. प्रत्यक्षात मात्र २४ टक्के सीईओंनी देशाची निर्यात घटत असल्याचे मत मांडले आहे.

Web Title: GDP increases with  Import

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.