lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > 29 वस्तूंवरील कर माफ तर 49 वस्तूंवरील कर कपात, जीएसटी परिषदेच्या बैठकीत निर्णय

29 वस्तूंवरील कर माफ तर 49 वस्तूंवरील कर कपात, जीएसटी परिषदेच्या बैठकीत निर्णय

29  हँडीक्राफ्ट वस्तूंवरील कर माफ करण्याचा आणि 49 वस्तूंवरील कर कपात करण्याचा निर्णय जीएसटी परिषदेच्या बैठकीत गुरुवारी घेण्यात आला. या निर्णयामुळे सर्व सामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2018 06:47 PM2018-01-18T18:47:01+5:302018-01-18T19:43:52+5:30

29  हँडीक्राफ्ट वस्तूंवरील कर माफ करण्याचा आणि 49 वस्तूंवरील कर कपात करण्याचा निर्णय जीएसटी परिषदेच्या बैठकीत गुरुवारी घेण्यात आला. या निर्णयामुळे सर्व सामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

29 tax deductions for Handicraft products and tax deduction for 49 items, decision taken at GST conference meeting | 29 वस्तूंवरील कर माफ तर 49 वस्तूंवरील कर कपात, जीएसटी परिषदेच्या बैठकीत निर्णय

29 वस्तूंवरील कर माफ तर 49 वस्तूंवरील कर कपात, जीएसटी परिषदेच्या बैठकीत निर्णय

नवी दिल्ली : 29  हँडीक्राफ्ट वस्तूंवरील कर माफ करण्याचा आणि 49 वस्तूंवरील कर कपात करण्याचा निर्णय जीएसटी परिषदेच्या बैठकीत गुरुवारी घेण्यात आला. या निर्णयामुळे सर्व सामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली जीएसटी परिषदेची बैठक आज घेण्यात आली. या बैठकीत 29 हँडीक्राफ्ट वस्तूंवरील कर माफ करण्यात आले. तसेच,  इतर 49 वस्तूंवरील कर कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आगामी अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर जीएसटी परिषदेची ही बैठक बोलविण्यात आली होती. यावेळी उत्तराखंडचे अर्थमंत्री प्रकाश पंत यांनी याबाबत माहिती दिली. 


या बैठकीत पेट्रोल-डिझेलवर कोणताही निर्णय होऊ शकलेला नाही. येत्या 25 जानेवारीपासून जीएसटी नवे दर लागू होणार असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले. जीएसटी परिषदेच्या बैठकीत 49 वस्तूंवरील जीएसटीत कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या वस्तूंवरील जीएसटी 5 ते 12 टक्क्यांच्या दरम्यान राहणार आहे. यामध्ये शेतीतील सिंचनासाठी वापरण्यात येणाऱ्या उपकरणांचा समावेश आहे.  







 

Web Title: 29 tax deductions for Handicraft products and tax deduction for 49 items, decision taken at GST conference meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :GSTजीएसटी