On the way to reading | वाचनाच्या वाटेवर

- रविप्रकाश कुलकर्णी

वाचनाचं महत्त्व काय आहे हे शिकायला लागलो तेव्हा कळायला लागलं. पण ते वयच असं असतं की कळतं पण वळत नाही. इथे कोणाच्यातरी मार्गदर्शनाची गरज भासते. पण सुरुवात केली की सुरुवात होते, हे मात्र तितकंच खरं. सध्या दिवाळी अंक वाचण्या-चाळण्याचा मौसम आहे. महिना - दोन महिन्यांनी वाचनालयातून दिवाळी अंक मिळण्याचं बंद होतं म्हणून ही घाई असते. या भाऊगर्दीत काही अंक हातांना लागणंपण मुश्कील असतं. मग ते राहून जातं ते राहूनच...
पण या धबडग्यात ‘अभिज्ञान’ विशेषांक हाताशी आला. अभिज्ञान म्हणजे प्रा. विनय जामसंडेकर यांनी पालक - विद्यार्थी - शिक्षक यांच्याशी साधलेला सुखद संवाद आणि मार्गदर्शन होतं. पण जामसंडेकर यांच्या अकाली जाण्यानं ही धुरा आता अभिज्ञान परिवारानं उचलली आहे. त्याचंच पुढचं पाऊल म्हणजे हा विशेषांक!
अभिज्ञानचा हा विशेषांक प्रेरणादायी पुस्तकांची पायवाट दाखवणारा आहे. आणि त्याचे अतिथी संपादक आहेत प्रल्हाद जाधव. या अंकात हेरंब कुलकर्णी, निरजा, वैशाली गेडाम, अवधूत परळकर अशी अनेक मंडळी
आहेत. ज्यांनी आपल्या वाचनानुभवानी दारं
किलकिली करून दाखवली आहेत. ज्यायोगे वाचणाºयाला कुतूहल वाटावे की अरे, यांना जर हा अनुभव येतो तर मग मी तरी मागे का राहू? हीच अपेक्षा हा अंक संपादित करताना प्रल्हाद जाधव यांनी ठेवली आहे, असं म्हणायला हरकत नाही.
पण विशेष लक्ष वेधायला हवं ते जोत्स्ना कदम यांच्या ‘दृश्यकलेतील प्रेरणादायी पुस्तके’ या लेखाकडे. आपल्याकडे शब्दप्रधान संस्कृतीचा प्रभाव जास्त आहे. त्या तुलनेत चित्रसाक्षरता, शिल्पसाक्षरता ही आता कुठे रुजू पाहत आहे. अशावेळी या विषयांबाबत लेखन यावे याचे भान संपादकांना आहे हे महत्त्वाचे आहे. पुढील काळातदेखील या विषयांकडे लक्ष द्यायला हवे असे वाटते. असाच वेगळा लेख आहे योगेश आंबेकर यांचा. वाचन अध्ययनासाठी संगीतोपचार या विषयाकडे जाणत्यांनी लक्ष द्यायला हवे.
हेरंब कुलकर्णी यांचा ‘बखर शिक्षणाची’ या पुस्तकात शिक्षकांनी जी पुस्तके आवर्जून वाचली पाहिजेत अशा ५५ पुस्तकांचा परिचय करून दिलेला आहे. निरजा यांनी आपल्या वाचन प्रकार सांगताना म्हटले आहे, पुस्तकांनी मला बुद्धिनिष्ठ व्हायला, सारासार विचार करायला शिकवलं.
स्त्री-पुरुष संबंधाकडे नितळपणे पाहायला शिकवलं. माणसामाणसांतील मैत्र जपायला शिकवलं. माणसं किती वेगवेगळ्या स्वभावाची असतात हे शिकवतानाच ती समजून घ्यायला शिकवलंच; पण आपली समाजव्यवस्था आणि त्यातलं समाजकारण, राजकारण, कोणत्या थराला गेलं आहे याची जाणीवही करून दिलं आहे.
संपादक प्रल्हाद जाधव यांनी हेन्री डेव्हिड थोरो या लेखकाची ओळख आपल्याला दुर्गा भागवत यांनी थोरोच्या पुस्तकांच्या केलेल्या अनुवादनामुळे कशी झाली हे उलगडून दाखवले आहे.
हे सगळं लेखन वाचणाºयांनी वाचणाºयांसाठीच केलेलं दिसतं. प्रश्न वेगळाच आहे.. ज्याला शालेय पुस्तकापलीकडे काही माहीत नाही, त्याच्यासाठी काय करायला हवे? शालेय जीवनात प्रत्येक टप्प्यावर कोणती पुस्तकं वाचायला हवीत याच्या मार्गदर्शनाची आवश्यकता आहे हे मात्र खरं!

वाचनाच्या वाटेवर
-रविप्रकाश कुलकर्णी