'मतदानाबाबतच्या दिशाभूल करणाऱ्या संदेशांपासून सावध राहा' निवडणूक प्रशासनाचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2024 12:40 PM2024-05-10T12:40:29+5:302024-05-10T12:40:53+5:30

हे प्रकार जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आले असून अशा संदेशांपासून सावध राहावे, अफवांवर विश्वास ठेवू नये; तसेच असे संदेश पुढे पाठवू नयेत, असे आवाहन जिल्हा निवडणूक प्रशासनाने केले आहे....

Election administration urges 'Beware of misleading messages about voting' | 'मतदानाबाबतच्या दिशाभूल करणाऱ्या संदेशांपासून सावध राहा' निवडणूक प्रशासनाचे आवाहन

'मतदानाबाबतच्या दिशाभूल करणाऱ्या संदेशांपासून सावध राहा' निवडणूक प्रशासनाचे आवाहन

पुणे :मतदान यादीत नाव नसल्यास नमुना क्र. १७ चा अर्ज भरून आणि आपले मतदार ओळखपत्र दाखवून मतदान करता येणार असल्याचा दिशाभूल करणारा संदेश पसरविला जात आहे. हे प्रकार जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आले असून अशा संदेशांपासून सावध राहावे, अफवांवर विश्वास ठेवू नये; तसेच असे संदेश पुढे पाठवू नयेत, असे आवाहन जिल्हा निवडणूक प्रशासनाने केले आहे.

मतदार यादीत नाव नसतानाही नावे यादीतून वगळलेली असलेल्या नागरिकांनी मतदान केंद्रावर जाऊन अर्ज क्र. १७ भरावा, असे नागरिक मतदार ओळखपत्र दाखवून मतदान करू शकणार असल्याने ज्यांची नावे मतदार यादीत नाहीत, त्यांनी मतदान केंद्रावर जाऊन त्वरित पुढील प्रक्रिया करावी, असा संदेश भ्रमणध्वनीवरून देण्यात येत आहे. अशा दिशाभूल करणाऱ्या माहितीवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, अशी चुकीची माहिती पसरविणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हा निवडणूक प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.

Web Title: Election administration urges 'Beware of misleading messages about voting'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.