छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2024 10:02 PM2024-05-14T22:02:22+5:302024-05-14T22:04:40+5:30

PM Modi Jiretop controversy: राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधान मोदींच्या डोक्यावर जिरेटोप घालून त्यांचे स्वागत केले.

Nana Patole slams Praful Patel over PM Modi wearing Chhatrapati Shivaji Maharaj Jiretop controversy | छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका

छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका

Nana Patole on PM Modi Jiretop controversy, Prafulla Patel: लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान मोदी यांनी वाराणसीतून आपला उमेदवारी अर्ज भरला. याशिवाय मोदी देशभरात विविध सभा, रोड शो करताना दिसत आहेत. याचदरम्यान राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जिरेटोप घालून त्यांचे स्वागत केले. या कृतीनंतर महाविकास आघाडी आक्रमक झाली असून यावर आक्षेप नोंदवला जात आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने याबाबत ट्विट करण्यात आले होते. त्यानंतर आता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी यावर टीकास्त्र सोडले आहे.

"हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षाकडून सातत्याने केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डोक्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरेटोप चढवून छत्रपती शिवाजी महाराज व त्यांना मानणाऱ्या करोडो शिवभक्तांचा अपमान केला आहे. या अपमानाबद्दल प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर माफी मागावी", अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

ते पुढे म्हणाले, "छत्रपती शिवाजी महाराज हे आपले दैवत आहेत पण या दैवताचा सातत्याने अपमान केला जात आहे. तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, भापजाचा प्रवक्ता सुधांशु त्रिवेदी, मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यासह अनेकांनी महाराजांचा अपमान केला पण भारतीय जनता पक्षाने त्यावर चकार शब्द काढला नाही."

"अयोध्यातील राम मंदिर उद्घाटन सोहळ्यातही श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंदगिरी महाराजांनी नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केली होती. असे प्रकार शिवाजी महाराजांचा अपमान करणारे आहेत, त्याला आळा घातला पाहिजे पण त्यात भरच पडत आहे. अंडरवर्ल्ड माफिया दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय इकबाल मिर्चीसोबत खासदार प्रफुल्ल पटेल यांनी जमीन व्यवहार केल्याप्रकरणी ईडीकडून चौकशी झाली होती. देशद्रोह्याची संबंध असलेल्या प्रफुल्ल पटेलचे पापी हात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जिरेटोपला लागले हे लाजिरवाणे आहे. या घटनेचा काँग्रेस पक्ष तीव्र शब्दात निषेध करत आहे", असेही नाना पटोलेंनी ठणकावून सांगितले.

Web Title: Nana Patole slams Praful Patel over PM Modi wearing Chhatrapati Shivaji Maharaj Jiretop controversy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.