Next

दातांनी ट्रक ओढणाऱ्या, छातीवर रोड रोलर घेणाऱ्या मुंबईतील 'शक्तिमान' नगरसेवकाची गोष्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2019 15:12 IST2019-04-07T15:10:52+5:302019-04-07T15:12:44+5:30

मुंबई - राजकीय शक्ती किती, यावरच कोणत्याही नेत्याचे मूल्यमापन होत असते, पण विनायक वाघधरे या मुंबईतील नगरसेवकाची ओळख होती ती ...

मुंबई - राजकीय शक्ती किती, यावरच कोणत्याही नेत्याचे मूल्यमापन होत असते, पण विनायक वाघधरे या मुंबईतील नगरसेवकाची ओळख होती ती त्यांच्या अचाट शारीरिक शक्तीसाठी! छातीवर धावता रोड रोलर घेणे, हातांनी लोखंडी पहार वाकविणे, दातांनी ट्रक ओढणे, धावत्या गाड्या हातांनी थांबविणे, अशा त्यांच्या अचाट शक्तीप्रयोगांना ७०च्या दशकात प्रचंड लोकप्रियता मिळाली. उद्योगपती जेआरडी टाटा यांनी त्यांना सुवर्णपदकाने गौरविले, तर पाँडीचेरीचे नायब राज्यपाल सयाजीराव सिलम यांनी ‘लोहपुरूष’ असा त्यांचा उल्लेख केला होता.

टॅग्स :मुंबईMumbai