महापौरांनी माझा विनयभंग केला नाही; 'त्या' महिलेचा प्रकरणावर पडदा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2019 15:13 IST2019-08-16T15:09:24+5:302019-08-16T15:13:36+5:30
महापौर विश्वनाथ महाडेश्वर सरांनी माझा हात पिरगळला नाही. त्यांनी माझा विनयभंग केलेलाच नाही. त्यामुळे त्यांच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार करण्याचा प्रश्नच ...
महापौर विश्वनाथ महाडेश्वर सरांनी माझा हात पिरगळला नाही. त्यांनी माझा विनयभंग केलेलाच नाही. त्यामुळे त्यांच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार करण्याचा प्रश्नच येत नाही, अशा शब्दात सांताक्रूजमधील आंदोलनातील ‘त्या’ महिलेने आपली भूमिका मांडली आहे. महाडेश्वर यांनी एका महिलेचा विनयभंग केला, त्यांनी महिलेचा हात मुरगळला’ असा संदेश प्रसारित करणारा व्हिडिओ व्हायरल करण्यामागे एका राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असून विश्वनाथ महाडेश्वर सरांची बदनामी करणे हा त्यांचा हेतू आहे, असंही मत या महिलेने व्यक्त केले आहे. यामुळे महापौरांविरोधात आक्रमक झालेल्या मनसे आणि राष्ट्रवादीला धक्का बसला आहे.