ओखी चक्रीवादळाचा तडाखा : पावसामुळे मनपानं शिवाजी पार्कमध्ये बांधलेलं मंडप कोसळलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2017 13:33 IST2017-12-05T13:27:22+5:302017-12-05T13:33:56+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त शिवाजी पार्कवर येथे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या हस्ते पुस्तिका प्रकाशन सुरू होते. यावेळी मनपाने ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त शिवाजी पार्कवर येथे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या हस्ते पुस्तिका प्रकाशन सुरू होते. यावेळी मनपाने बांधलेल्या मंडपावर पावसाचे पाणी साचल्यानं मंडप अचानक कोसळलं. सुदैवानं, या घटनेत कुणालाही दुखापत झालेली नाही. पुस्तिका प्रकाशनानंतर महापौर व आयुक्त स्टेजवरुन उतरले होते.

















