Join us  

​तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील गोकुळधाम सोसायटीतील फटाक्यांची चोरी अजय देवगणने केली?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2017 7:58 AM

तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका टीआरपीच्या रेसमध्ये नेहमीच अव्वल असते. त्यामुळे या मालिकेत अनेक कलाकार आपल्या चित्रपटांचे ...

तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका टीआरपीच्या रेसमध्ये नेहमीच अव्वल असते. त्यामुळे या मालिकेत अनेक कलाकार आपल्या चित्रपटांचे प्रमोशन करायला येतात. गोलमाल या चित्रपटाचे आजवरचे सगळेच भाग प्रचंड गाजले आहेत. त्यामुळे या चित्रपटाच्या पुढच्या भागाची म्हणजेच गोलमाल अगेनची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे. या चित्रपटात अजय देवगण, श्रेयस तळपदे, तुषार कपूर, अर्शद वारसी, कुणाल खेमू यांच्यासोबतच तब्बू आणि परिणिती चोप्रा प्रेक्षकांना मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटाची टीम नुकतीच तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेच्या सेटवर प्रमोशनसाठी गेली होती.गोकुळधाम सोसायटीमध्ये सगळेच सण धुमधडाक्यात साजरे केले जातात. पण या सगळ्या सणांच्या वेळी गोकुळधाम सोसायटीमध्ये नेहमीच कोणता ना कोणता तरी गोंधळ होत असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. आता देखील दिवाळी सेलिब्रेशनमध्ये एकच गोंधळ उडणार आहे. गोकुळधाम सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी आत्मराम भिडे सगळ्यांसाठी फटाके घेऊन येणार आहे आणि हे फटाके क्लब हाऊसमध्ये ठेवणार आहे. त्यानंतर क्लब हाऊसला लॉक करून तो जाणार आहे. पण ही चावी पोपटलाल पळवणार आहे. सगळ्यांशी मस्करी करूया असे तो ठरवणार आहे. काही केल्या भिडे आणि इतर मंडळींना चावी मिळणार नाहीये. भिडे तर चावी शोधून शोधून कंटाळणार आहे. भिडे कंटाळला आहे हे कळल्यानंतर पोपटलाल चावी देणार आहे. पण क्लब हाऊसचा दरवाजा उडल्यावर सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसणार आहे. कारण क्लब हाऊसमधील फटाकेच गायब होणार आहेत. त्यावर आता पोलिसांना बोलवूया असे गोकुळधामवासिय ठरवणार आहेत. पण त्याचवेळी अजय देवगणची एंट्री होणार आहे. आता अजय देवगण काय करतो हे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. अजय देवगणनेच हे फटाके चोरले की खरा फटाका चोर कोण आहे हे मालिका पाहिल्यावरच प्रेक्षकांना कळणार आहे.अजय देवगण, तुषार कपूर, श्रेयस तळपदे, कुणाल खेमू यांना या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. Also Read : तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत नट्टू काका आणि बाघा सोडणार जेठलालाचे गडा इलेक्ट्रॉनिक्स?