Join us  

​“कुंकू, टिकली आणि टॅटू” मालिकेमध्ये रंगणार कुंकू विरुध्द टॅटूचा सामना!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2018 11:42 AM

“कुंकू, टिकली आणि टॅटू” या मालिकेमध्ये रमा आणि राजचे नुकतेच लग्न झाले आहे.रमाचा गृहप्रवेश झाला असून आता टॅटू लग्न ...

“कुंकू, टिकली आणि टॅटू” या मालिकेमध्ये रमा आणि राजचे नुकतेच लग्न झाले आहे.रमाचा गृहप्रवेश झाला असून आता टॅटू लग्न होऊन कुंकू म्हणजेच विभा कुलकर्णी यांच्या घरात आली आहे. हा विवाहसोहळा निर्विघ्नपणे पार पडला असून जेंव्हा विभा आणि रमा या दोन परस्परविरोधी विचारसरणी असलेल्या स्त्रिया एकमेकांसमोर आल्या आहेत आता काय होईल ? रमाची आधुनिक विचारसरणी आणि कुलकर्ण्यांचा परंपरावाद यांचा मेळ बसेल का ? रमा या घरामध्ये कशी रमेल? या घरातील चालीरीती कश्या आपल्याश्या करेल ? विभा रमाला कसे सांभाळून घेईल ? यामध्ये तीक्लीची भूमिका काय असेल? हे बघणे रंजक असणार आहे.प्रेक्षकांना पडलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे लवकरच मिळणार आहे. रमा आणि राजचा लग्नसोहळा निर्विघ्नपणे पार पडला पण कुलकर्णींच्या परंपरेच्या चौकटीत टॅटूचे अस्तित्व टिकेल का ? हा प्रश्नच आहे. गृहप्रवेश करत असताना रमाला उखाणा घ्यायला सांगितला पण, तिचा तो स्वभाव नसल्याने तिला काहीच कळेना तर घरात आलेल्या सुनेला विभाने मदत केली. घरामध्ये आल्यानंतर रमाला कुलकर्णी यांच्या बऱ्याच गोष्टी कळल्या आहेत. ज्या कामीनीनेच तिला सांगितल्या आहेत, जसे सातच्या आत घरात, घरामध्ये फक्त आयुर्वेदिक औषधांचा वापर, सगळ्यात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे घरामध्ये मोबाईल कुणीच वापरत नाही कारण त्याला मनाई आहे, तसेच घरातील पुरुष मंडळी आजूबाजूला असताना जोरजोरात न बोलणे, आरडाओरडा न करणे, अश्या काही गोष्टी कामिनी तिला सांगते ज्यामुळे रमाला प्रचंड राग येतो. आणि पुढे काय करावे हे सुचत नाही.रमाला गृहप्रवेश केल्यानंतर पहिल्याच दिवशी घराबाहेर रहावे लागते. घरी आलेल्या नव्या सुनेला एकटीला घराबाहेर ठेवणे बरे नाही म्हणून विभा आणि घरातील लहान मुलगी गौरी देखील घराबाहेर पूर्ण दिवस रहातात. हे सगळे व्हायला निमित्त ठरते रमाचे सातच्या नंतर घरी न परतणे.रमा आणि विभा, तसेच कुलकर्णी परिवार यांच्या विचारात असलेली तफावत खूपच मोठी असल्याने रमा या घरामध्ये कशी टिकून राहील ? ती काही बदल घडवून आणू शकेल का ? अशा सगळ्या गोष्टी पाहणे रंजक ठरणार आहे.