By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2018 17:09 IST
1 / 6ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना शुक्रवारी रेखा आणि राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते यश चोप्रा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.2 / 6या कार्यक्रमात आशा भोसले आणि रेखा यांनी एकमेकींशी मनसोक्त गप्पा मारल्या.3 / 6आशाताईंना पाहून रेखा यांना आपल्या भावना आवरता आल्या नाहीत आणि त्या थेट आशाताईंच्या पाया पडल्या.4 / 6रेखा यांच्याशिवाय जयाप्रदा, पद्मिनी कोल्हापुरे, पूनम धील्लन, परीणिती चोप्रा यासारख्या अभिनेत्री, प्रसिद्ध गायिका अल्का याज्ञिक, यश चोप्रा यांच्या पत्नी पामेला चोप्रा आणि अभिनेते जॅकी श्रॉफ सोहळ्याला उपस्थित होते. 5 / 6या सोहळ्यात अनेक तारे-तारकांनी यश चोप्रा यांच्या आठवणींना उजाळा दिला.6 / 6यश चोप्रा आणि आशा भोसले या दोन व्यक्तींमुळे मी आज इथवर पोहचले. त्या माझ्या आयुष्याचा भाग आहेत. मंगेशकर कुटुंबाकडून मी खूप काही शिकले आहे. त्यांच्या गाण्यांवर परफॉर्म करावं लागत असल्यामुळे मी आधी खूप घाबरायचे. मला नजरेतून एक्स्प्रेशन्स द्यावे लागायचे. पण त्यांच्याकडून कायम हसतमुख राहायला शिकले, असे रेखा यांनी सांगितले.