1 / 6मुंबई विमानतळावर आज एक मोठा विमान अपघात टळला. एका रुग्णाला घेऊन नागपुरहून हैदराबादला निघालेल्या विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर करण्यात आले. 2 / 6नागपूर ते हैदराबाद मार्गावरील नॉन-शेड्यूल विमानात क्रूचे २ सदस्य, १ रुग्ण, १ नातेवाईक आणि १ डॉक्टर होते. अग्निशमन आणि बचाव प्रतिसादक, फलो वाहने, सीआयएसएफ, वैद्यकीय पथक यांच्यासह विमानतळांच्या आपत्कालीन प्रतिसाद पथकास प्रवाशांच्या सुरक्षित बाहेर काढण्यासाठी त्वरित मदत करण्यात आली. 3 / 6दरम्यान, या विमानाच्या लँडिगनंतर काही काळ हवेत चाललेल्या थराराची माहिती आणि वैमानिकाने कौशल्य पणाला लावून केलेल्या लँडिंगची थरारक समोर आली आहे.4 / 6मुंबई विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग होणार आहे, असा मेसेज आल्यानंतर मंदार भारदे आणि त्यांची टीम तातडीने विमानतळावर गेली. हे विमान जेटसर्फ कंपनीचे होते. राजस्थान सरकार मध्ये पायलट म्हणून काम केलेले आणि आता खाजगी विमानाचे सारथ्य करणारे कॅप्टन केसरी सिंग करत होते. त्यांनी जीवावर उदार होऊन हे लँडिंग केले. अशा पद्धतीचे लँडिंग करणे अत्यंत कठीण असते. पण त्यात त्यांना यश आले.5 / 6 मंदार भारदे लोकमतशी बोलताना म्हणाले, अशाप्रकारचे लँडिंग करताना विमान पोटावर उतरवावे लागते. या विमानाचे एक चाक निघून गेले होते. त्यामुळे त्याचे लँडिंग गियर ओपन होत नव्हते. अशावेळी हे विमान उतरवताना पोटावर उतरवले, तर आत असणाऱ्या पेट्रोलचा स्फोट होण्याची शक्यता असते. नागपूरहून विमान निघाले त्याच वेळी त्याचे एक टायर तुटून गेले होते. विमानात पेट्रोल भरपूर होते. त्यामुळे विमान पोटावर लँड करताना स्फोटाची भीती होती. कॅप्टननी आधी इमर्जन्सी लँडिंगची परवानगी घेतली, आणि पेट्रोल संपेपर्यंत विमान एक तास हवेत फिरवत ठेवले.6 / 6ज्यावेळी लँड करण्याइतपत पेट्रोल विमानात शिल्लक राहिले त्यावेळी त्याचा अंदाज घेऊन त्यांनी हे विमान उतरवले. यासाठी लागणारा वेळ आणि पेट्रोल याचे अचूक गणित मांडता आले पाहिजे. ते त्यांनी मांडल्यामुळे विमानाचा स्फोट न होता विमान व्यवस्थित लँड झाले. विमानात एक रुग्ण होता ज्याला मुंबईत उतरवण्यात आले आहे.