1 / 5मुंबई शहरासह उपनगरात दुपारी साडेतीन वाजल्यापासून वादळी वाऱ्यासह सुरू झालेल्या अवकाळी पावसाने अक्षरशः मुंबईकरांना झोडपून काढले.2 / 5मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडले. अनेक भागात घराची पत्रे उडून गेल्याची घटना घडली.3 / 5या पावसामुळे काही ठिकाणी वीजपुरवठा खंडीत झाला. एका ठिकाणी वाहनावर झाड पडल्याची घटना घडली. या घटनेत वाहनांचे नुकसान झाले. सुदैवाने, कोणतीही जीवितहानी झाली नाही.4 / 5मुंबईकरांची लाइफलाइन समजल्या जाणारी लोकल सेवा विस्कळीत झाली. त्यामुळे कामावरून घरी जाण्यासाठी निघालेल्या चाकरमान्यांचे हाल झाले.5 / 5दक्षिण मुंबईसह मध्य मुंबई व उपनगरातील विविध रस्ते पावसामुळे वाहतूक कोंडीत सापडले. त्यामुळे बुधवार मुंबईकरांसाठी त्रासदायक ठरला.