कसदार, पिळदार! मुंबईकरांनी अनुभवला शरीरसौष्ठवाचा थरार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2018 21:05 IST2018-02-19T20:59:47+5:302018-02-19T21:05:24+5:30

दृष्ट लागण्याजोगं झालेलं दिमाखदार आयोजन आणि शरीरसौष्ठवपटूंची पीळदार शरीरयष्टी पाहून तहानभूक विसरलेल्या तब्बल पाच हजार क्रीडाप्रेमींना मुंबई श्रीचा पीळदार आणि दमदार थरार पुन्हा एकदा अनुभवायला मिळाला.
या स्पर्धेमध्ये अनेक नामांकित शरीरसौष्ठवपटू सहभागी झाले होते.
एकापेक्षा एक खेळाडू असलेल्या मुंबई श्रीच्या जेतेपदाच्या लढतीत परब फिटनेसच्या सुजल पिळणकरने फॉर्च्युन फिटनेसच्या सकिंदर सिंग आणि आर.एम.भट जिमच्या सुशांत रांजणकरवर मात केली आणि विजेतेपद पटकावले.
स्पर्धेतील पदाधिकाऱ्यांसमवेत सुजल पिळणकर