Supriya Sule: सुप्रिया सुळेंसमवेत बॉलिवूडची ती 'शक्ती'शाली महिला कोण? ओळखा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2022 16:43 IST
1 / 8राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे या सोशल मीडियावर अतिशय सक्रीय असतात. आपल्या दैनंदीन घडामोडींची माहितीही त्या ट्विटरवरुन देतात. 2 / 8सुप्रिया सुळेंची नुकतेच बॉलिवूडमधील प्रसिद्ध डान्सर आणि कोरियोग्राफर शक्ती मोहन हिने भेट घेतली. मात्र, या भेटीच्या फोटोत मास्कमुळे ती अजिबात ओळखू येत नाही. 3 / 8सुप्रिया सुळेंनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन हा फोटो शेअर केला आहे. तसेच, विथ शक्ती मोहन असं कॅप्शन त्यांनी दिलंय. त्यांचं हे ट्विट शक्ती मोहनने रिट्विट केलं आहे. 4 / 8शक्ती मोहन ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध कोरियोग्राफर असून डान्सर आहे, तसेच अनेक रिएलिटी शोमध्येही ती जज म्हणून काम करत असल्याचं आपण टिव्हीवर पाहिलं आहे. 5 / 8शक्ती मोहननेही सुप्रिया सुळेंची ट्विट रिट्विट करत, महिला सक्षमीकरणासाठी करत असलेल्या कामाचं कौतूक केलंय. तसेच, आपणास भेटून अत्यानंद झाल्याचंही म्हटलंय. 6 / 8महिला सक्षमीकरणासाठी आपण करत असलेलं काम हे प्रेरणादायी आहे. लोकांच्या अडचणी सोडविण्यासाठी आपण अथक परिश्रम घेता हे पाहून आश्चर्य वाटलं. 7 / 8आपणास अधिकाधिक ऊर्जा मिळो, असे म्हणत शक्ती मोहनने सुप्रिया सुळेचं कौतूक केलं आहे. 8 / 8सुप्रिया सुळे नेहमीच विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांच्या भेटीचे फोटो ट्विटरवरुन शेअर करतात. तसेच, त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांचं अभिनंदही करतात.