... म्हणून मनसेची शिवजयंती तिथीनुसार साजरी, ठाकरेंनी सांगितलं राज'कारण'
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2022 15:08 IST
1 / 10शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत आज चांदीवली आणि गोरेगाव येथे मनसेच्या नव्या पक्ष कार्यालयाचं उदघाटन आज राज ठाकरे यांच्या हस्ते झालं. 2 / 10राज ठाकरेंनी शिवजयंतीबद्दल बोलताना मनसेकडून तिथीनुसार शिवजयंती का साजरी केली जाते, याचे संदर्भासहीत स्पष्टीकरण दिले. शिवजयंती तिथीनं साजरी करायचं कारण आहे. 3 / 10आपल्याकडे जेवढे सण येतात, दिवाळी येते, गणपती येतात, जेवढे काही सण आपण साजरे करतो. ते सर्व सण तिथीनुसार आपण साजरे करतो. 4 / 10आपण, ते सण तारखेनं साजरे करत नाही. गेल्यावर्षी दिवाळी कोणत्या तारखेला होती, यावर्षी त्याच तारखेला नसते. मागच्यावर्षी गणपती कोणत्या तारखेला होते, यावर्षी वेगळ्याच तारखेला येतात. 5 / 10जन्मदिवस, वाढदिवस हे आपले असतात. महापुरुषांचा, तोही छत्रपतींचा जन्मदिवस हा आपल्यासाठी सण आहे. म्हणून तो तिथीनुसार साजरा करायचा. याचा अर्थ आज साजरी करू नये असा नाही. 6 / 10कारण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती 365 दिवस साजरी केली पाहिजे. त्यामुळेच, तिथीनं साजरी होणारी शिवजयंती ही यापेक्षाही जल्लोषात साजरी केली पाहिजे, असे राज ठाकरेंनी म्हटले. 7 / 10राज ठाकरे यांना पाहण्यासाठी यावेळी कार्यकर्त्यांनी तुफान गर्दी केली होती. चांदीवली येथील कार्यालयाचं उदघाटन करुन झाल्यानंतर राज ठाकरे गोरेगाव येथील कार्यालयाचं उदघाटन करण्यासाठी रवाना झाले होते. 8 / 10गोरेगाव येथील कार्यालयाचं उदघाटन करताना कार्यकर्त्यांची तुफान गर्दी झाली होती. राज यांच्या हस्ते उदघाटन झाल्यानंतर कार्यालयाच्या शेजारीच एक स्टेज उभारण्यात आला होता. 9 / 10राज ठाकरे, बाळा नांदगावकर यांच्यासह मनसेचे इतर नेते आणि स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते. पण, स्टेजवर क्षमतेपेक्षा अधिक कार्यकर्ते आल्यानं स्टेजचा पुढील भाग कोसळला.10 / 10सुदैवाने राज ठाकरे यांना कोणतीही दुखापत झालेली नाही. राज ठाकरे यांचे सुरक्षारक्षक, पोलीस आणि कार्यकर्त्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे ते सुखरूप राहिले. तर, कार्यकर्त्यांनाही कोणतीही दुखापत झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.