श्रेयस व दीप्ती तळपदेंनी टाटा रुग्णालयातील चिमुकल्यांसोबत साजरा केला व्हॅलेंटाइन डे
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2018 00:07 IST2018-02-15T00:04:36+5:302018-02-15T00:07:56+5:30

मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता श्रेयस तळपदे आणि त्याची पत्नी दीप्ती तळपदे यांनी आज टाटा रुग्णालयाला भेट दिली.
परळ इथल्या टाटा रुग्णालयातील लहानग्यांबरोबर त्यांनी व्हॅलेंटाइन डे साजरा केला आहे.
लहानग्यांसोबत गिटार वाजवून त्यानं व्हॅलेंटाइन डेचा मनमुराद आनंद लुटला.
श्रेयस यांनी लहानग्यांसह सेल्फीही घेतला अन् चिमुकल्यांशी मनमोकळ्या गप्पागोष्टी केल्या.
श्रेयस आणि दीप्तीनं यावेळी चिमुकल्यांबरोबर केकही कापला.