Join us  

'होय, मी प्रखर राष्ट्रवादी अन्...'; संजय राऊत यांनी नारायण राणेंच्या टीकेला लगेच उत्तर दिलं!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2022 6:54 PM

1 / 6
शिवसेनेचे नेते संजय राऊत यांची नजर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खुर्चीवर आहे. संजय राऊत शिवसेनेचे नाही. तर शिवसेना संपवण्यासाठी राष्ट्रवादीची सुपारी घेतली आहे, संजय राऊत पूर्ण राष्ट्रवीदचे आहेत,असे म्हणत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
2 / 6
संजय राऊत हे काही शिवसेनेचे नाहीत. ते शिवसेनेची स्थापना झाल्याच्या २६ वर्षांनंतर आले होते. तेही ते काही शिवसैनिक नव्हते. ते सामनाचे संपादक म्हणून आले. त्यांनी लोकप्रभामध्ये असताना बाळासाहेबांना देखील सोडलं नाही. त्यांच्यावर टीका केली होती आणि आता म्हणत आहेत की माझ्यामागे बाळासाहेबांचा आशीर्वाद आहे, असं म्हणत नारायण राणेंनी संजय राऊतांवर निशाणा साधला.
3 / 6
नारायण राणेंच्या या टीकेवर संजय राऊत यांनी देखील उत्तर दिलं आहे. होय, मी प्रखर राष्ट्रवादी आणि राष्ट्रभक्त आहे.माझा डोळा मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर नाही तर शिवसेनेच्या प्रसारावर आहे. शिवसेनेचा प्रसार जोरात होत आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
4 / 6
संजय राऊत पुढे म्हणाले की, २०२४ पर्यंत शिवसेना दिल्लीच्या तख्तापर्यंत पेहोचलेली असेल आणि त्यावेळी बरेच लोक बेरोजगार झाले असतील, असा टोला संजय राऊत यांनी यावेळी लगावला.
5 / 6
दरम्यान, संजय राऊत अर्धे नव्हे, तर पूर्णपणे राष्ट्रवादीचे आहेत. शिवसेना वाढविण्यात राऊतांनी काहीच योगदान दिलेलं नाही. शिवसेना नसती तर संजय राऊत इथवर पोहोचूच शकले नसते. त्यांनी बाळासाहेबांबद्दल किती वाईट बोललेलं आहे ते मला माहित आहे. मी ते कधीच ऐकून घेतलेलं नाही. माझ्यासमोर बोलला असता तर तिथंच दाखवून दिलं असतं, असं नारायण राणे म्हणाले.
6 / 6
संजय राऊत हे पगारी नेते आहेत. ओव्हरटाइम करू कमावतो. प्रवीण राऊतच्या चौकशीनंतर आपण पण अडचणीत येणार आहोत याच्या भीतीनं नुसता थयथयाट सुरू आहे. संजय राऊतंची संपूर्ण कुंडलीच माझ्याकडे आहे. त्यांनी मला तोंड उघडायला लावू नये', असं नारायण राणे म्हणाले.
टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतNarayan Raneनारायण राणे Shiv SenaशिवसेनाBJPभाजपा