By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2022 17:43 IST
1 / 7राज्यात एकीकडे एकनाथ शिंदे या नावाने राजकीय धुरळा उडवून दिला आहे. शिवसेनेत बंडखोरी करत एकनाथ शिंदेंनी 30 ते 35 आमदारांसह सूरत गाठले. 2 / 7एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीनंतर शिवसेनेत शिंदेशाही निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियात रंगली असताना, मंचरच्या शिंदेकन्येनं वर्ल्ड रेकॉर्ड बनवलाय. 3 / 7मावळ मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी ट्विट करुन सुप्रिया शिंदे यांनी बनविलेला शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळ्याचे फोटो शेअर केले आहेत. तसेच, त्यांच्या रेकॉर्डबद्दलही माहिती दिली आहे. 4 / 7आपल्या मंचरच्या सुप्रियाताई शिंदे यांनी रोज १४ तास काम करून ७५ दिवसांत छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा मेटलमध्ये बनवून 'वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडिया' मध्ये आपलं नाव नोंदवल. 5 / 7सुप्रिया शिंदेंच मनापासून अभिनंदन! लोकनेते किसनराव बाणखेले यांचा मंचर येथील पुतळाही त्यांनीच तयार केला आहे. सुप्रियाताई, माझ्या शुभेच्छा आपल्यासोबत आहेत!, अशी माहिती अमोल कोल्हे यांनी दिली. 6 / 7खा. कोल्हेंच्या ट्विटमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा दिसत असून त्यावर कलाकारी करताना सुप्रिया शिंदेही दिसत आहेत. या फोटोत पुतळ्याची निर्मितीचे सुरुवातीचे फोटो आहेत. 7 / 7तसेच, महाराजांचा पुतळा बनवून पूर्ण झाल्यानंतर तो मेटलमध्ये बनल्यानंतरचाही फोटो शेअर करण्यात आला आहे. महाराजांचा हा पुतळा भारदस्त दिसून येतो.