Join us

Sambhajiraje: 'या' निर्णयाची कुटुंबीयांनासुद्धा माहिती नव्हती, संभाजीराजेंनी हात जोडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2022 22:50 IST

1 / 9
राज्यसभा खासदार आणि मराठा समाजाचे नेते संभाजीराजे छत्रपती यांनी अखेर उपोषण मागे घेतले. सरकारने मागण्या मान्य केल्यानंतर संभाजीराजेंनी उपोषण सोडले. त्यानंतर, आज सोशल मीडियातून त्यांनी सर्वांचे आभार मानले
2 / 9
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांची अंमलबजावणी करण्यासाठी मी आमरण उपोषणाचा निर्णय घेतला होता. हा निर्णय घेत असताना माझ्या कुटुंबातील कोणाला याची कल्पना दिली नव्हती.
3 / 9
कारण, घेतलेल्या निर्णयापासून परावृत्त करण्यासाठी सर्वांचे प्रयत्न झाले असते. माझ्यासाठी हा कठीण काळ होता. लोकशाहीमध्ये मिळालेल्या घटनात्मक कक्षेत राहून समाजावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध हा लढा देण्याचा निर्धार माझ्या मनात पक्का होता.
4 / 9
छत्रपती घराण्याची परंपराच कठीण काळात निर्भयणे व आत्मविश्वासपुर्ण सामोरे जाण्याची असल्याने घराण्याची पुण्याई माझ्या कामी आली, आणि या लढाईला धीरोदात्तपणे सामोरा गेलो.
5 / 9
तुम्हा सर्वांच्या सदभावना, पत्नी संयोगीताराजे, व चिरंजीव शहाजीराजे यांची खंबीर साथ, वडील करवीरअधिपती शाहु छत्रपती महाराज, आईसाहेब, याज्ञसेनी महाराज यांचे आशिर्वाद, शककर्ते श्री शिवाजी महाराज, राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांची पुण्याई मला लाभली.
6 / 9
माझ्या प्रकृतीची काळजी घेत मराठा समाजाच्या प्रतिनीधींनी दाखवलेली समयसूचकता, प्रिंट मिडीया, व इलेक्ट्रॉनिक मिडीया यांनी या उपोषणाचं महत्व जाणून दिलेल कव्हरेज.
7 / 9
तसेच सोशल मिडीयाच्या माध्यमातून तुम्हा सर्वांनी केलेला उठाव हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी कारणीभूत आहेत. आपल्या सर्वांचे प्रेम आणि सदभावना वृध्दिंगत राहो, जेणेकरून मला या महाराष्ट्राची, देशाची अधिकाधिक सेवा करण्याची उर्जा मिळेल.
8 / 9
दरम्यान, राज्य सरकारने मागण्या मान्य केल्यानंतर संभाजीराजेंनी मंगळवारी उपोषण मागे घेतलं. यावेळी मंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ज्यूस पाजला
9 / 9
संभाजीराजेंच्या आंदोलनाला जगभरातील मराठा तरुणांनी पाठिबा दर्शवला, सोशल मीडियातून हा पाठिंबा दर्शविण्यात आला
टॅग्स :Sambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीMumbaiमुंबईMaratha Reservationमराठा आरक्षण