Join us  

Ravi Rana: तुरुंगातून बाहेर येताच रवी राणांचं 'हनुमान चालिसा पठण'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2022 7:03 PM

1 / 9
मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर हनुमान चालिसा म्हणणाऱ्या खासदार नवनीत राणा Navneet Rana आणि आमदार रवी राणांची रवानगी १२ दिवसांपूर्वी तुरुंगात झाली.
2 / 9
अखेर कोर्टानं जामीन दिल्यानंतर दोघांची आज कारागृहातून सुटका झाली. तुरुंगातून सुटका होताच नवनीत राणा थेट लिलावती रुग्णालयात दाखल झाल्या. रक्तदाब, मणक्याचा त्रास होत असल्यानं नवनीत राणांनी रुग्णालय गाठलं.
3 / 9
नवनीत राणा रुग्णालयात दाखल झाल्यानंतर थोड्याच वेळात त्यांचे पती रवी राणा हेही तुरुंगातून बाहेर आले. विशेष म्हणजे तुरुंगातून बाहेर येताना गाडीत बसल्यानंतर रवि राणा यांनी हनुमान चालिसा पठण केले.
4 / 9
रवि राणांचे हनुमान चालिसा पठण करतानाचे फोटो सध्या सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. त्यामध्ये, ते स्वत: हनुमान चालिसा पठण करताना दिसून येत आहेत.
5 / 9
रवि राणांनी तुरुंगातून थेट लिलावती रुग्णालय गाठले. रवी राणांना पाहून नवनीत राणांना अश्रू अनावर झाले. त्या रडू लागल्या. रवी राणांना तळोजा कारागृहात ठेवण्यात आलं होतं.
6 / 9
आज सुटका झाल्यानंतर त्यांनी लिलावती रुग्णालय गाठलं आणि पत्नीची विचारपूस केली. बरेच दिवसांनंतर दोघांची भेट झाली. रवी राणांना पाहून नवनीत राणा ढसाढसा रडल्या.
7 / 9
रवी राणा लिलावती रुग्णालयापूर्वी भाजपचे नेते किरीट सोमय्या तिथे उपस्थित होते. सोमय्यांसोबत राणा लिलावती रुग्णालयात नवनीत राणांच्या भेटीसाठी पोहोचले.
8 / 9
नवनीत राणांना स्पॉन्डेलिसिसचा त्रास आहे. त्यांना आधीच रुग्णालयात दाखल करायला हवं होतं. मात्र तुरुंग प्रशासनानं उशीर केला, असं रवी राणा लिलावती रुग्णालयाकडे जात असताना म्हणाले.
9 / 9
रुग्णालयात जात असताना त्यांच्या हातात हनुमान चालिसा होती. त्यांनी अनेकदा ती प्रसारमाध्यमांना दाखवली. त्यातून, रवि राणा यांनी आपली हमुमान चालिसाची भूमिका अद्यापही ठाम असल्याचंच दाखवून दिलंय.
टॅग्स :navneet kaur ranaनवनीत कौर राणाRavi Ranaरवी राणाCourtन्यायालयhospitalहॉस्पिटल