1 / 5सीएसएमटी रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर क्रमांक 18वर सोलापूर एक्सप्रेसच्या रिकामी डब्याला आग लागल्यानं एकच खळबळ उडाली आहे. 2 / 5लांबपल्ल्याच्या गाड्या उभ्या असलेल्या यार्डात सोलापूर एक्स्प्रेसच्या डब्याला आग लागल्यानं फलाटावरील प्रवाशांमध्ये एकच तारांबळ उडाली.3 / 5 सुदैवानं या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. परंतु आगीचे कारण अद्याप अस्पष्टच आहे.4 / 5आगीमुळे एकाच बोगीचे नुकसान झाले. या आगीबाबत सविस्तर माहिती घेण्याचे काम सुरू आहे.5 / 5 यार्डसारख्या भागात प्रत्येक ठिकाणी सुरक्षा पुरवणे शक्य नाही तरी देखील अग्निशमन दलाने चांगली कामगिरी करत तात्काळ आगीवर नियंत्रण मिळवले.