Join us  

Photos : नेत्यांची कडक एन्ट्री, शिवरायांचं दर्शन अन् विरोधकांची घोषणाबाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2021 12:24 PM

1 / 13
राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घडामोडींमुळे या अधिवेशनात सत्ताधारी महाविकास आघाडी आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भाजपामध्ये जोरदार खडाजंगी होण्याची शक्यता आहे.
2 / 13
गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे या अधिवेशनामध्ये उपस्थित राहणार का, याबातत राजकीय वर्तुळातून तर्कवितर्क लढवले जात आहेत.
3 / 13
विधिमंडळाच्या अधिवेशनाला मुख्यमंत्री उपस्थित राहतील. मुख्यमंत्र्यांना योग्य वाटेल तेव्हा योग्य वेळी ते विधिमंडळाच्या कामकाजात सहभागी होतील, अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली.
4 / 13
अधिवेशनाच्या पहिल्या दिवसासाठी राजकीय मंडळींनी कडक एन्ट्री पाहायला मिळाली. उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची विधानभवन परिसरात दमदार एन्ट्री झाल्याचे फोटो त्यांनीच ट्विट केले आहेत.
5 / 13
देवेंद्र फडणवीस यांनी काल पत्रकार परिषदे घेऊन राज्य सरकारला एकप्रकारे इशाराच दिला आहे. तर, चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कारही घालण्यात आला होता.
6 / 13
देवेंद्र फडणवीस यांनी नेहमीप्रमाणे कडक एंट्री केली, रेड कार्पेटवरुन त्यांनी विधीमंडळ सभागृहाकडे वाटचाल केली.
7 / 13
मुख्यमंत्री सध्या अधिवेशनात आले नाहीत, पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेचे अध्यक्ष नरहरी झिरवळ यांची भेट घेऊन चर्चा केली.
8 / 13
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विधीमंडळ सभागृहात मंत्री आणि सदस्यांशी वार्तालाप केला.
9 / 13
महाविकास आघाडी सरकारचे सर्वच मंत्री आणि आमदार या वार्तालाप बैठकीला उपस्थिते होते, अजित पवार यांनी मार्गदर्शन केलं.
10 / 13
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात विरोधी पक्षांतील आमदारांनी पायरीवरु बसून सरकारचा निषेध नोंदवला. तसेच, राज्यातील विविध प्रश्नांकडे लक्षही वेधले.
11 / 13
अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी उपमुख्यमंत्री यांनी विधीमंडळ परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घातला.
12 / 13
यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोषही करण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची अनुपस्थिती यावेळी दिसून आली.
13 / 13
पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होऊन दर्शन घेतले
टॅग्स :Ajit Pawarअजित पवारShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजVidhan Bhavanविधान भवनMumbaiमुंबई