Photos : नेत्यांची कडक एन्ट्री, शिवरायांचं दर्शन अन् विरोधकांची घोषणाबाजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2021 12:48 IST
1 / 13राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घडामोडींमुळे या अधिवेशनात सत्ताधारी महाविकास आघाडी आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भाजपामध्ये जोरदार खडाजंगी होण्याची शक्यता आहे. 2 / 13गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे या अधिवेशनामध्ये उपस्थित राहणार का, याबातत राजकीय वर्तुळातून तर्कवितर्क लढवले जात आहेत. 3 / 13विधिमंडळाच्या अधिवेशनाला मुख्यमंत्री उपस्थित राहतील. मुख्यमंत्र्यांना योग्य वाटेल तेव्हा योग्य वेळी ते विधिमंडळाच्या कामकाजात सहभागी होतील, अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली.4 / 13अधिवेशनाच्या पहिल्या दिवसासाठी राजकीय मंडळींनी कडक एन्ट्री पाहायला मिळाली. उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची विधानभवन परिसरात दमदार एन्ट्री झाल्याचे फोटो त्यांनीच ट्विट केले आहेत. 5 / 13देवेंद्र फडणवीस यांनी काल पत्रकार परिषदे घेऊन राज्य सरकारला एकप्रकारे इशाराच दिला आहे. तर, चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कारही घालण्यात आला होता.6 / 13देवेंद्र फडणवीस यांनी नेहमीप्रमाणे कडक एंट्री केली, रेड कार्पेटवरुन त्यांनी विधीमंडळ सभागृहाकडे वाटचाल केली. 7 / 13मुख्यमंत्री सध्या अधिवेशनात आले नाहीत, पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेचे अध्यक्ष नरहरी झिरवळ यांची भेट घेऊन चर्चा केली.8 / 13उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विधीमंडळ सभागृहात मंत्री आणि सदस्यांशी वार्तालाप केला. 9 / 13महाविकास आघाडी सरकारचे सर्वच मंत्री आणि आमदार या वार्तालाप बैठकीला उपस्थिते होते, अजित पवार यांनी मार्गदर्शन केलं. 10 / 13देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात विरोधी पक्षांतील आमदारांनी पायरीवरु बसून सरकारचा निषेध नोंदवला. तसेच, राज्यातील विविध प्रश्नांकडे लक्षही वेधले.11 / 13अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी उपमुख्यमंत्री यांनी विधीमंडळ परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घातला. 12 / 13यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोषही करण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची अनुपस्थिती यावेळी दिसून आली. 13 / 13पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होऊन दर्शन घेतले