Join us  

अंधेरी स्टेशनवर पादचारी पुलाचा भाग कोसळला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2018 9:51 AM

1 / 6
अंधेरी आणि विलेपार्ले दरम्यानचा पादचारी पूल कोसळल्यानं पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली.
2 / 6
सकाळी 7 वाजून 40 मिनिटांनी अंधेरी रेल्वे स्थानकाजवळील पुलाचा काही भाग कोसळला. पुलाचा भाग रेल्वे रुळांवर कोसळल्यानं पश्चिम रेल्वेची सेवा ठप्प झाली आहे.
3 / 6
रेल्वे सेवा ठप्प झाल्यानं ऑफिसला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
4 / 6
सध्या अग्निशमन दल आणि एनडीआरएफकडून कोसळलेल्या पुलाचा ढिगारा उपसण्याचं काम सुरू आहे.
5 / 6
पश्चिम रेल्वेसोबतच हार्बर रेल्वेच्या वाहतुकीलादेखील फटका बसला आहे.
6 / 6
अंधेरी रेल्वे स्थानकाच्या जवळ असणारा गोखले पादचारी पूल हा 60 वर्ष जुना होता. हा पूल कोसळल्यानं 2 जण जखमी झाले आहेत.
टॅग्स :Andheri Bridge Collapsedअंधेरी पूल दुर्घटनाMumbaiमुंबईwestern railwayपश्चिम रेल्वेRainपाऊस