1 / 9१ जून, १९४८ रोजी पुणे-नगर या मार्गावरून सुरु झालेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी सेवेने ७५ वर्ष पूर्ण केली आहेत, याचे समाधान वाटते, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी लाल परीच्या आठवणी जागवल्या आहेत. 2 / 9मुख्यमंत्री शिंदे यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून लालपरीमुळे गावखेड्यात प्रवास सुखाचा आणि सुकर झाल्याचं सांगितलं. तर, परराज्यातही सेवा दिली असून महामंडळाच्या सर्व कर्मचारी व अधिकारी वर्गाचं कौतुकही केलंय.3 / 9आपल्या सुखकर आणि सुरक्षित प्रवासी सेवेमुळे एसटी ही सर्वसामान्यांची जीवनवाहिनी बनली आहे. आज ग्रामीण भागापासून शहरी भागात देखील प्रवासासाठी एसटीला मोठी पसंती दिली जाते. 4 / 9विशेष म्हणजे आपल्या शासनाने महिलांसाठी एसटी प्रवासात ५० टक्के सूट तर ७५ वर्षांवरील नागरिकांना मोफत प्रवास योजना सुरु केली असून या योजनेला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.5 / 9आज कर्नाटक, गोवा, आंध्रप्रदेश, तेलंगणा, गुजरात आणि मध्यप्रदेश या राज्यात महाराष्ट्राची एसटी सेवा विस्तारली आहे. या विस्ताराचे संपूर्ण श्रेय महामंडळातील अधिकारी, कर्मचारी, वाहक, चालक, तंत्रज्ञ यांचे आहे. 6 / 9त्यांनी आपल्या लाडक्या लालपरीला हिरकणी, शिवनेरी, शिवशाही आणि विठाई या नावांसह आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली आणि आज स्पर्धात्मक युगात देखील ती भक्कम उभी आहे. 7 / 9शासनाच्या पुढाकाराने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची ही जीवनवाहिनी अविरत सुखद प्रवास देत राहील. लोकांच्या सुख दुःखात धावून येणाऱ्या आपल्या लालपरीने स्वतःचा अमृत महोत्सव पूर्ण केल्याचा विशेष आनंद आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले. 8 / 9महाराष्ट्र परिवहन महामंडळातील सर्व अधिकारी, कर्मचारी, चालक, वाहक तसेच प्रवासी बंधू भगिनी यांचे मनापासून अभिनंदन. या ७५ वर्षांच्या प्रवासात आपला मोलाचा वाटा आहे. 9 / 9आपण यापुढे देखील एसटीची गती कायम ठेवून उत्तम प्रवास सेवा जनतेला देणार, हा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.