ए हालो.... नीता अंबानींच्या घरी उत्साहात नवरात्रोत्सव साजरा, पाहा सजावट आणि फॅशनेबल लूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 22:10 IST
1 / 8अंबानींच्या घरातील दुर्गापूजा पंडालमध्ये नऊ रंगांची थीम होती. संपूर्ण पंडालमध्ये झेंडूच्या माळा, दिवे आणि हाताने तयार केलेल्या खास वस्तू वापरण्यात आल्या होत्या. तसेच एक सजवलेल्या ढोलकीही लटकवल्या होत्या, ज्याने सजावट अधिक खुलून आली.2 / 8नवरात्रोत्सवासाठी घट सजवला जातो, त्याप्रमाणेच एक खास कलश सजवण्यात आला होता. या कलशाला मोती, मणी आणि खास प्रकारच्या दगडांनी सजवले होते. तसेच कलशाभोवती अतिशय सुंदर नक्षीकाम करण्यात आले होते.3 / 8नीता अंबानी यांचा लूकदेखील खूप खास होता. त्यांनी नऊ रंगांचा ड्रेस परिधान केला होता. म्हणजेच नीता अंबानी यांनी 'नवरंग लेहेंगा-चोली' घातली होती. त्यांचा लेहेंगा बनारसी ब्रोकेडपासून बनवला होता. हा लेहेंगा बनवण्यासाठी सुमारे १५८ दिवस लागल्याचे बोलले जाते.4 / 8नीता अंबानी यांनी लेहेंगा-चोलीला तीन थरांच्या राणी हारसोबत मॅच-अप केले होते, जे खूपच सुंदर दिसले. त्यांनी हलका मेकअप केा होता आणि साजेशी हेअरस्टाईल करून मोगऱ्याचा गजराही लावला होता.5 / 8अंबानी कुटुंबाची सर्वात धाकटी सून, राधिका मर्चंट, हिचा लूकही आकर्षक होता. त्यांनी बहुरंगी लेहेंगा-चोली आणि सुंदर नेकलेस घातला होता. त्यांनीही हलका मेकअप केला होता आणि छान हेअरस्टाईल केली होती. चेहऱ्यावर स्मितहास्याने त्या अधिक सुंदर दिसत होत्या.6 / 8अंबानींची मुलगी ईशा अंबानी यादेखील आकर्षक लूकने लक्ष वेधून घेत होत्या. ईशा यांनी हाताने भरतकाम केलेला मॅजेन्टा रंगाचा लेहेंगा-चोली घातला होता. त्यांचा लेहेंगा देखील बहुरंगी होता. त्यांनी एक सुंदर अशा चोकर सेटने आपला लूक पूर्ण केला होता.7 / 8मुकेश अंबानी यांच्या आई कोकिला बेन देखील खूपच सुंदर दिसत होत्या. त्यांनी गुलाबी रंगाची रेशमी साडी नेसली होती आणि मोत्याचा हार घातला होता. मध्यम आकाराची टिकली आणि केसात गजरा असा लूक करत त्यांनीही लक्ष वेधून घेतले.8 / 8अंबानी कुटुंबाच्या सेलिब्रेशनमध्ये दांडियाही खेळण्यात आल्या. नीता अंबानी यांनी नातवासोबत दांडिया खेळण्याचा आनंद लुटला. अंबानी कुटुंबाचा नवरात्र उत्सव दरवर्षीप्रमाणे या वर्षीही भव्यदिव्य आणि मजेदार होता.