Join us  

Mumbai Rain Updates: मुंबई पाण्यात बुडाली; 'तुंबई'चे धडकी भरवणारे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2019 7:34 PM

1 / 10
मान्सूनच्या परतीचा महिना म्हणून ओळख असलेल्या सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच मान्सूनने रौद्र रूप धारण केले आहे. गेल्या 24 तासांपासून मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि रायगडमध्ये मान्सूनने तुफान फटकेबाजी केली आहे.
2 / 10
पुढील 2 ते 3 दिवस मान्सून राज्यभर सक्रिय राहील. विशेषत: कोकण आणि मध्य महाराष्ट्रावर मान्सूनचा जोर राहील.
3 / 10
पावसाचा फटका हा रेल्वे वाहतुकीला देखील बसल्याने रेल्वेच्या तिन्ही मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
4 / 10
शहर भागात सर्वाधिक पाऊस दादर परिसरात झाला असून तिथे 168.15 मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. या खालोखाल वडाळा परिसरात 158.97, धारावी परिसरात 148.58, रावळी कॅम्प परिसरात 139.2 एवढ्या पावसाची नोंद झाली आहे.
5 / 10
टिळक पूल, कुर्ला- श्रध्दा जंक्शन, माला गार्डन, बंटर भवन, लायब्रेरी जंक्शन झोन आठ बीकेसी सायन – षण्मुखानंद हॉल, एस. आय. ई. एस कॉलेज, अंधेरी - एस.व्ही. रोड, अंधेरी सबवे, वडाळा सर्कल पंचायत या ठिकाणी पाणी साचले आहे.
6 / 10
हिंदमाता परिसराचा समावेश असलेल्या एफ दक्षिण विभागात 113.78 मीमी एवढ्या पावसाची नोंद झाली आहे‌. मुंबई महानगरपालिका मुख्यालय येथे याच कालावधीत एकूण 69.35 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
7 / 10
सायन ते कुर्ला, विक्रोळी ते भांडुप येथे रेल्वे मार्गावर पाणी साचल्यामुळे सीएसएमटी ते ठाणे लोकलसेवा बंद केली आहे
8 / 10
मुंबईसह राज्याच्या अनेक भागात पावसाचा जोर वाढल्याने अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्यानं रस्ते वाहतुकीचा वेगदेखील मंदावला आहे. वेस्टर्न आणि इस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील वाहतूक संथगतीने सुरू आहे.
9 / 10
चुनाभट्टी येथे रेल्वे मार्गावर पाणी साचल्यामूळे सीएसएमटी ते वाशी लोकलसेवा देखील बंद आहे.
10 / 10
हवामान खात्याने मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने आज मुंबई, कोकण आणि ठाण्यातील सर्व सरकारी आणि खासगी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात येत असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून दिली आहे. (सर्व फोटो: सुशील कदम)
टॅग्स :Mumbai Rain Updateमुंबई मान्सून अपडेटcentral railwayमध्य रेल्वेwestern railwayपश्चिम रेल्वेRainपाऊसMumbaiमुंबई