Join us
Daily Top 2Weekly Top 5

३२० रुपये मोजून एक्सप्रेसवेवर १८ तासांपासून नरकयातना! ४० किमीची कोंडी, मुलांचे अन्नाविना हाल; एक्स्प्रेसवेवरील वाहतूक कधीपर्यंत सुरळीत होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 18:05 IST

1 / 8
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर आडोशी बोगद्याजवळ एक टँकर पलटी झाला आहे. या टँकरमधून अतिज्वलनशील प्रोपलीन (Propylene) गॅसची गळती सुरू आहे. यामुळे प्रशासनाकडून गळती रोखण्याचे काम युद्धापातळीवर सुरू आहे.
2 / 8
टँकर पलटी झाल्यामुळे गेल्या १५-२२ तासांपासून मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद असून, सुरक्षेसाठी NDRF आणि BPCL ची टीम गॅस नियंत्रित करत आहे. १० ते १२ किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
3 / 8
अनेकांनी २२ तासापूर्वी प्रवास सुरू केला होता. पण, ते प्रवासी अजूनही मुंबईत पोहोचलेले नाहीत. अजूनही ते वाहतूक कोंडीत अडकले आहेत. अनेक प्रवाशांनी पुण्यातून ३२० रुपये मोजून प्रवास सुरू केलाय. पण, अजूनही पोहोचलेले नाहीत. यामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे.
4 / 8
गॅस अत्यंत ज्वलनशील असल्याने 'एनडीआरएफ' (NDRF) आणि 'बीपीसीएल' (BPCL) च्या तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले आहे. गॅस गळती पूर्णपणे थांबल्याशिवाय टँकर हलवणे धोक्याचे असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. दरम्यान, पुणे ग्रामीण पोलिसांनी माणुसकी दाखवत दुचाकीवरून अडकलेल्या प्रवाशांपर्यंत बिस्किटांचे पुडे आणि पाण्याच्या बाटल्या पोहोचवण्यास सुरुवात केली आहे.
5 / 8
गुगल मॅपवरही अजूनला ट्राफिक जाम दिसत आहे. हे ट्राफिक गेल्या अनेक तासांपासून आहे. याामुळे आता मुंबईहून सुटणाऱ्या बसेस रद्द करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे.
6 / 8
प्रोपलीन गॅस वाहून नेणारा टँकर पलटी झाल्याने अत्यंत ज्वलनशील गॅसचा धोका निर्माण झाला आहे. गॅस गळतीमुळे होणारी संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी महामार्ग पोलिसांनी मुंबईकडे जाणारी वाहतूक बंद केली आहे.
7 / 8
टँकरमधून गॅस गळती सुरूच असल्याने प्रशासनाला परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठा वेळ लागत आहे. मुंबईकडे जाणारी वाहतूक पुणे-मुंबई लेनकडे वळवण्यात आली असून, वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
8 / 8
'गॅस लिकेजचे प्रमाण पूर्ण बंद होईपर्यंत आपल्याला वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे. याकरता पुण्याहून मुंबईला जाणारी जी वाहतूक आहे ती जर ताम्हीणी घाट मार्गे तसेच इकडून कर्जतमार्गे वाहतूक सुरू केली तर त्याचा फायदा होणार असल्याचे सांगत त्यांनी या मार्गाचा वापर करण्यास सांगितले आहे. गॅस टँकरची गळती थांबवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
टॅग्स :highwayमहामार्गTrafficवाहतूक कोंडी