लोकल प्रवास होणार प्रसन्न; महिला डब्यात निसर्गाचा सुखद गारवा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2018 12:32 IST2018-08-31T11:47:04+5:302018-08-31T12:32:14+5:30

मुंबईची लाईफलाईन अशी ओळख असणाऱ्या लोकलच्या डब्यांचा चेहरा-मोहरा लवकरच बदलला जाणार आहे. मध्य रेल्वेवरील प्रवाशांचा प्रवास हा रंगीबेरंगी चित्रांच्या साहाय्याने अधिक सुखकर होणार आहे.
मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी ही खूशखबर असून निसर्गचित्रांनी सजलेल्या सुंदर डब्यातून लवकरच महिला प्रवाशांना प्रवास करण्याची संधी मिळणार आहे.
लोकलच्या डब्याला आतून एक वेगळाच नवीन लूक देण्यात आला असून गुलाबी, हिरव्या रंगाचा वापर करून फुलपाखरं, फुलं यासारखी चित्रे रेखाटण्यात आली आहेत.
मध्य रेल्वेच्या माटुंगा येथील वर्कशॉपमध्ये लोकलच्या डब्यांना रंग देण्याचे काम सुरू आहे.
पहिल्या टप्प्यामध्ये महिला प्रवाशांचे दोन डबे रंगविण्यात आले असून लवकरच प्रवाशांना त्याचा आनंद लुटता येणार आहे.
निसर्गचित्रांनी सजवलेले आणखी काही सुंदर डबे लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार असून टप्प्याटप्प्याने त्याला रंग दिला जाणार आहे.