तिरंगी रंगात न्हाऊन निघाली मुंबई
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2019 22:37 IST2019-01-25T22:31:12+5:302019-01-25T22:37:56+5:30

मुंबई : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई महानगरपालिका, विधानभवन आणि मंत्रालयाच्या इमारतीला तिरंगी विद्युत रोषणाई करण्यात आली.
मुंबईच्या वैभवात भर घालणाऱ्या या वास्तू हजारो दिव्यांनी उजळून निघाल्या होत्या.
या इमारतींच्या नयनरम्य दृष्याला काही नागरिकांनी डोळ्यात साठवले तर काहींनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केले.
प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह देशभरात जय्यत तयारी सुरू आहे.
मुंबईत शहरात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई पोलिसांनी महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षाव्यवस्थेत वाढ केली आहे. (सर्व फोटो - सुशील कदम)