मुंबई : किंग्स सर्कल रेल्वे पुलाखाली अडकला कंटेनर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2018 14:33 IST2018-03-06T14:33:33+5:302018-03-06T14:33:33+5:30

हार्बर रेल्वे मार्गावरील किंग्स सर्कल रेल्वे स्थानकाच्या पुलाला एका कंटेनरची जोरदार धडक बसून अपघात झाला.
मंगळवारी (6 मार्च) पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, अपघातानंतर हा कंटेनर पुलाखाली अडकला.
या अपघातामुळे परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.
पोलिसांनी कंटेनर चालकाला घेतले ताब्यात.
पुलाखाली सुमारे दोन तास कंटेनर अडकल्यामुळे दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या व यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.