Join us  

आमदार एक, वेशभूषा अनेक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2019 7:45 PM

1 / 10
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये नेहमी आपल्या लूकमुळे अधिवेशन काळात चर्चेत येतात. आमदार एक वेशभूषा अनेक अशीच त्यांची महती बनली आहे.
2 / 10
मागील अधिवेशनात शिवाजी महाराजांच्या पोशाखात येऊन बेमूर्वतखोर सत्ताधाऱ्यांना चालते व्हा असा आदेश देत प्रश्नांकडे लक्ष वेधून घेण्याचे अभिनव आंदोलन केले होते.
3 / 10
तसेच दुसरीकडे संभाजी भिडे यांनी आंबा खाल्ल्याने मुलं होतात या विधानाचा निषेध करण्यासाठी संभाजी भिडे यांच्या वेशात विधानभवनात प्रवेश करुन आंब्याची पेटी हातात घेतली होती.
4 / 10
संभाजी भिडेंच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी त्यांनी चक्क संभाजी भिडेंच्या वेशात विधानभवनात इतर आमदारांना चक्क आंबेही वाटले होते.
5 / 10
संत तुकाराम महाराजांच्या अपमान झाल्याचा निषेध नोंदवताना प्रकाश गजभिये यांनी संत तुकाराम यांचा वेश धारण केला होता.
6 / 10
मुंबईवर झालेल्या २६/११ हल्यातील शहीद पोलिस अधिकारी हेमंत करकरे यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्याविरोधात अनेक स्तरातून टीका झाली होती.
7 / 10
हेमंत करकरेंनी मला चुकीच्या पद्धतीने अडकवले, त्यांना मी सांगितले होते की, तुमचा सर्वनाश होईल, त्यांचा स्वत:च्या कर्मानेच मृत्यू झाला, असे धक्कादायक विधान प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केले होते.
8 / 10
यावेळी प्रकाश गजभिये यांनी मी प्रज्ञाच्या शापाने मेलो नाही ही अंधश्रद्धा आहे. मी देशासाठी शहीद झालो आहे अशा आशयाचे पोस्टर घेऊन प्रज्ञा ठाकूरच्या वक्तव्याचा निषेध केला.
9 / 10
गजभिये यांनी तेथील सुरक्षा रक्षक आणि सुरक्षा प्रमुखांनी अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, नेहमीप्रमाणे ते नव्या वेशात विधानभवनात पोहोचलेच.
10 / 10
प्रकाश गजभिये यांच्या शहीद हेमंत करकरे लूकची मोठी चर्चा विधानभवन परिसरात झाली. गजभिये यांनी अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त केला.
टॅग्स :Prakash Gajbhiyeप्रकाश गजभियेNCPराष्ट्रवादी काँग्रेसMLAआमदारvidhan sabhaविधानसभा