नौदलाच्या जवानांनी सादर केली चित्तथरारक प्रात्यक्षिके

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2017 09:05 PM2017-11-28T21:05:37+5:302017-11-28T21:09:48+5:30

मुंबई : 4 डिसेंबर नौदल दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

त्यानिमित्ताने मुंबईतील गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरात नौदलाच्या जवानांनी बिटिंग द रिट्रिट कार्यक्रमाची रंगीत तालीम केली.

यावेळी नौदलाच्या जवानांनी अनेक प्रात्यक्षिके सादर केली.

तसेच, यामध्ये अनेक विद्यार्थ्यांचा सुद्धा सहभाग होता.

दरम्यान, 4 डिसेंबरला नौदल दिनाच्या निमित्ताने याठिकाणी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.

1971 च्या भारत व पाकिस्तान युद्धामध्ये नौदलाने चढविलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे भारताला विजयश्री मिळविणे अधिक सुकर झाले. या नौदलाच्या कामगिरीचे नाव होते ऑपरेशन ट्रायडण्ट.

हा क्षेपणास्त्र हल्ला चढविण्यात आला तो दिवस 4 डिसेंबर म्हणून नौदल दिन साजरा करण्यात येतो. (सर्व फोटो - सुशील कदम)