Lockdown : सो गया है रस्ता... कडक निर्बंधातही मुंबईत दिसतोय 'लॉकडाऊन'
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2021 11:58 IST
1 / 11राज्यात कडक लॉकडाऊनला व्यापाऱ्यांकडून होत असलेला विरोध तसेच ठिकठिकाणी झालेल्या आंदोलनांची दखल सरकारने घेतल्याचे दिसत आहे. 2 / 11मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी व्यापारी संघटनांनी केलेल्या चर्चेनंतर आता शनिवार, रविवारी कडक लॉकडाऊनऐवजी कडक निर्बंध लावण्याची भूमिका राज्य सरकारने घेतली. 3 / 11शुक्रवारी या संदर्भातील सुधारित नियमावली जारी करण्यात आली. राज्य सरकारने ‘ब्रेक द चेन’ नियमावलीत नवीन बदलांचा समावेश केला आहे. 4 / 11‘वीकेंड लॉकडाऊन’मध्ये अत्यावश्यक सेवेतील दुकानांना परवानगी देण्यात आली आहे. विनाकारण घराबाहेर न पडण्याचेही नवीन आदेशात सुचविण्यात आले आहे. 5 / 11पाच दिवस कडक निर्बंध आणि शनिवार, रविवार कडक लॉकडाऊन असे सूत्र आधी निश्चित करण्यात आले होते. मात्र, आजची नियमावली बघता वीकेंडलादेखील कडक निर्बंधच असतील.6 / 11मुंबईच्या रस्त्यावर सरकारच्या विकेंड लॉकडाऊनची झलक पाहायला मिळाली. रस्ते निर्मनुष्य दिसून आल्याने पुन्हा एकदा जुन्या लॉकडाऊनची आठवण झाली. 7 / 11मुंबईतील सीएसटी परिसरात आणि महापालिका परिसरात ना गर्दी दिसली, ना ट्रॅफिक. त्यामुळे, मुंबईकरांनी विकेंड लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद दिल्याचे दिसून येत आहे. 8 / 11राज्यात 5 दिवस कडक निर्बंध आणि शनिवार व रविवारी कडक लॉकडाऊन लादण्यात आला आहे. त्या, पार्श्वभूमीवर 5 दिवस निर्बंध पाळल्यानंतर आज लोकं घरीच असल्याचे दिसून येते. 9 / 11शहरातील विविध चौकात कडक पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे. ये-जा करणाऱ्या नागरिकांना पोलिसांकडून विचारणा करण्यात येत आहे. 10 / 11मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी लॉकडाऊनसंदर्भात विचारविनिमय करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलविली आहे. त्याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. 11 / 11मुख्यमंत्र्यांच्या आजच्या बैठकीनंतर पुढील लॉकडाऊनसंदर्भात माहिती मिळणार आहे, तोपर्यंत कडक निर्बंध लागूच राहणार आहेत