दिव्या-दिव्यांची ज्योत सांगते...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2019 11:19 AM2019-10-15T11:19:29+5:302019-10-15T11:23:15+5:30

दिवाळी म्हणजे मनातील दु:ख, काळजी, द्वेष दूर करून भरभराटीचा प्रकाश सर्वत्र पसरवणारा असा दिव्यांचा सण.

याच मातीच्या दिव्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या धारावीच्या कुंभारवाड्यात सध्या दिवाळीची जोरदार तयारी सुरू आहे.

छोट्या पारंपरिक पणत्यांपासून ते मोठ्या कंदिलांपर्यंत दिसणाऱ्या दिव्यांनी कुंभारवाड्यातील घरे आणि दुकाने सजली आहेत.

कुंभारवाड्यातल्या घरांत धगधगणा-या भट्ट्या, त्यातून निघणारे धुराचे लोट, ओल्या मातीचा वास.

घराघरांत ठेवलेले मातीचे ढीग आणि रंग-मातीने माखलेली रंगीत माणसे हेच चित्र दिसते.

इथल्या दिव्यांपासून सगळ्यांची घरोघरी दिवाळी साजरी होते आणि जणू आपणही इतरांचे आयुष्य असेच उजळवून टाकावे, असा संदेश हे दिवे देतात.

अंधाराला दूर सारणा-या या दिव्यांच्या निर्मितीचा आढावा लोकमतचे वरिष्ठ छायाचित्रकार दत्ता खेडेकर यांनी घेतला आहे.